डायबेटिक नियंत्रक

VHKL :  पवनमुक्तासन हा एक सोपा आणि प्रभावी योगासन आहे. याचे नाव "पवन" म्हणजे वायू आणि "मुक्त" म्हणजे सोडणे यावरून पडले आहे. हे आसन पोटातील वायू कमी करण्यास मदत करते, म्हणूनच पचनक्रियेसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. पवनमुक्तासन नियमित केल्यास पचनक्रिया सुधारते आणि मधुमेहासारख्या विकारांवर नियंत्रण मिळवता येते. योग्य पद्धतीने व शिस्तबद्ध सराव केल्यास याचे अनेक फायदे अनुभवता येतात.

कसे करावे: पाठीवर झोपा. दोन्ही पाय सरळ ठेवा. उजवा पाय गुडघ्यात वाकवून छातीजवळ आणा. दोन्ही हातांनी गुडघा धरून छातीवर दाब द्या. डोके वर उचलून नाक गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद श्वास रोखून ठेवा आणि नंतर मोकळे करा. हे डाव्या आणि दोन्ही पायांसोबत प्रत्येकी 2-3 वेळा करा.


फायदे: पाचनशक्ती वाढवतो,  पोटातील गॅस आणि सूज कमी करतो, मधुमेह नियंत्रणात मदत करतो, पाठ आणि कंबरेचे ताण कमी करतो


टीप: गर्भवती स्त्रिया, पाठीच्या गंभीर त्रास असणारे आणि ऑपरेशन झालेल्या व्यक्तींनी हे आसन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.


(वेबसाईट लिंकवर क्लिक करून #ब्लॉग सेक्शनमध्ये #आर्थिक #मानसिक #शारीरिक #आरोग्य आणि #सुखसमृद्धीसाठी लेख उपलब्ध आहेत. या सेवेचा लाभ घेऊन #आयुष्य #यशस्वी बनवा #आध्यात्मिक #भौतिक #ज्ञानप्राप्तीसाठी पेज #लाइक #शेअर# फॉलो आणि आपली #प्रतिक्रिया द्या)


website : https://vighnahartas.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!