श्री स्वामी समर्थांना प्रार्थना
VHKL : चला परम कृपाळू श्री दत्त गुरू अवतार श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करूया : ॥ ओम स्वरूपाय नमः ओम सद्गुरु नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमः॥ हे सद्गुरु स्वामी समर्थ...! आजच्या शुभदिनी, नतमस्तक होऊन आपल्या चरणी ही प्रार्थना करतो की, कुटुंबातील सदस्य, मित्र आणि आप्तेष्ट यांच्यासह सर्वांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहो. सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आर्थिक उन्नती नांदो.
सर्वांना सकारात्मक ऊर्जा लाभो आणि त्यांच्यातील सत्व व रज गुणांची वाढ होवो. निसर्गावर प्रेम करण्याची आणि प्राणिमात्रांविषयी करुणा बाळगण्याची भावना जनमानसात रुजावी.
कुटुंबात स्नेह, आपुलकी आणि प्रेमभाव वाढो. नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन मिळो आणि प्रत्येकजण आपापले कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडो. आमच्यातील सप्त चक्र सक्रिय होवोत आणि प्रत्येकाच्या जीवनात अध्यात्माची प्रगती होवो. आम्ही स्वतःच्या आणि इतरांच्या दुःखांवर मात करून समृद्ध जीवन जगू शकू.
जगाचे कल्याण आणि दुष्ट विचारधारेच्या लोकांना सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळो, अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो.
॥ ओम श्री स्वामी समर्थाय नमः॥
(वेबसाईट लिंकवर क्लिक करून #ब्लॉग सेक्शनमध्ये #आर्थिक #मानसिक #शारीरिक #आरोग्य आणि #सुखसमृद्धीसाठी लेख उपलब्ध आहेत. या सेवेचा लाभ घेऊन #आयुष्य #यशस्वी बनवा #आध्यात्मिक #भौतिक #ज्ञानप्राप्तीसाठी पेज #लाइक #शेअर# फॉलो आणि आपली #प्रतिक्रिया द्या)
website : https://vighnahartas.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा