शिस्त आणि नियोजन


एचके लर्निग अँड एनएए
नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? मजेत ना! मजेत आहोत असे म्हणायला शिका, किंबहुना ती सवयच लाऊन घ्या. सकारात्मक बोलणे एकप्रकारची उर्जाच असते. आज आपल्याशी खूप महत्वाच्या विषयावर चर्चा करावीशी वाटली म्हणून ब्लॉग लिहत आहे. चला तर मग विषयावरचं येऊ. शीर्षक वाचून आपल्या लक्षात आलच असेल की, शिस्त आणि नियोजन यावर आपली ही चर्चा. मित्रांनो, शिस्त आणि नियोजन हे दोन शब्द नाहीत तर, हे यश मिळवून देणारी दोन महासुत्र आहेत. आपण जर आपल्या आयुष्याचा मागोवा घेतला तर नक्कीच कळत न कळत आपण या सूत्रांचा आधार घेतलेला असेलच. 

आपल्या वागण्यात, बोलण्यात, कार्यात शिस्त ही असायलाच हवी. त्यासोबत नियोजनही तितकेच गरजेचे. शिस्त बिघडली की त्याचे काय काय परिणाम भोगावे लागतात हे प्रत्येकाने अनुभवले असेलच. शिस्त आणि नियोजन तर प्रत्येक बाबतीत असायलाच हवी; पण आज आपण केवळ तीन अश्या शिस्तीबद्दल बोलू ज्याचा सरळ सरळ आणि ताबडतोब बरा वाईट परिणाम दिसायला लागतो. 

मित्रांनो, देह, शरीर म्हणजे काय? आणि यावर काय बोलावं? प्रत्येक जण दिवसातून किती वेळा आरशासमोर स्वतःला टीपटाप करत असतो. ही शिस्त जवळजवळ प्रतेकाला कळत नकळत लागलेलीच असते; पण कधी आपण हा विचार करतो का? जेवढं सुंदर दिसणं महत्वाचं तेवढंच शरीर निरोगी असन सुद्धा खूप महत्वाचं. तुम्ही वर वर हो म्हणाल हो, पण अंतर्मनाला विचारा बघू, आपण निरोगी राहण्यासाठी खरच काही करतो का? नाहीच करत ना? मित्रांनो सर्व बाजूला ठेवा; मात्र स्वतः निरोगी राहण्यासाठी शिस्त पाळा आणि नियोजन करा. दवाखण्यात वेळ घालवण्यापेक्षा निसर्गात रमा. आता निरोगी राहण्यासाठी काय करायला हवं हे नका विचारू. आपणच अनेकांना सल्ले देत असतो की, अस करावं तस करावं. मग आपण त्याची अंमलबजावणी करतो का? विचारा बघू स्वतः ला. तर मग आपणच या नव वर्षापासून प्रारंभ करायला नको का? काय बरोबर आहे ना, पटतयन…? चला तर मग आजच ठरवून घेऊ या. लोकांना निरोगी राहण्यासाठी टिप्स देण्याआधी त्याचे आपणच अनुकरण करूया. 

या पाच ते सहा फुटाच्या देहात जे मन आहे ते खूप चंचल आणि संवेदनशील आहे. ते जपायला हव नाहीतर दुष्परिणाम आपण सर्वांना माहीत आहेतच. या मनाला शिस्त लावता आली तर जिंकलोच समजा. मनाला बजावून ठेवा, निष्कारण विचार करून डोक्याला ताप देवू नको म्हणाव. अहो, केव्हाही आणि कुठेही भटकंती असते या मनाची. बर, असे असे भयानक काल्पनिक घटना रंगवल्या जातात की, ब्लड प्रेशर आणि शुगर आपोआप वाढते हो. वर्तमानात जगत असताना म्हातारपणी कस होईल हे सुध्दा चित्रीकरण दाखवत हे मन. असो, आधी मनाला शिस्त लावून नियोजन काय असत हे शिकवायला हवे. अवघड आहे का? हो आहे अवघड; पण एकाग्रता, ध्यान ही शस्त्र स्वतः जवळ बाळगा म्हणजे मन जास्त शेपारणार नाही. स्थिर राहील. आणि मानसिक आरोग्यही बिघडणार नाही. 

मित्रांनो, आर्थिक आरोग्य उत्तम असायलाच हवे. वरील दोन शिस्त स्वतः ला लावून घेतली की, आर्थिक शिस्त आपोआपच लागेल. आता आर्थिक शिस्त कशी लावावी हे थोड समजवाव लागेल. मित्रांनो, यासाठी उत्पन्न आणि खर्च यात संतुलन असायला हवे. बर संतुलन असून चालणार नाही येथे नियोजनही गरजेचे आहे. बचत आणि गुंतवणूक करत राहिलो तर भविष्यातील कठीण प्रसंगांना तोंड देण्यास मदत होते. आणि हो इमर्जन्सी फंड हा प्रतेकाजवळ असायलाच हवा. आपल्या आयुष्यात रोज अडचणी येत नाही; पण एखादी आर्थिक अडचण कधीतरी अशी येते की त्यावेळेस व्यवस्था नसेल तर होत्याचे नव्हते होऊन जाते. म्हणून आपल्या उत्पन्नातून ठराविक रक्कम इमरजन्सी फंड म्हणून स्वतंत्र खात्यात ठेवत राहावी. आपण जर यशस्वी लोकांच्या आयुष्याचा मागोवा घेतला तर असे निदर्शनास येईल की, त्यांनी शिस्त आणि नियोजन याला खूप महत्त्व दिले आहे. म्हणून ते आज यशोशिखरावर विराजमान आहेत. मित्रांनो आपल्याला आजची चर्चा कशी वाटली नक्की कळवा. आपल्या ब्लॉगचा इतरांनाही उपयोग होईल त्यासाठी ब्लॉग शेअर करा.

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली