आहार पोटासाठी की चवीसाठी?

एचके लर्निग अँड एनएए
आहार सर्वांसाठीच महत्त्वाचा मानला जातो. मात्र नुसता आहार अन्‌ उत्तम आहार यात फरक आहे. पोटासाठी खावे की चवीसाठी? हे समजून घेणे खूपच गरजेचे आहे. आहार घेताना पौष्टिक असावा विरुद्ध आहार घेऊ नये, असे आहारतज्ज्ञांकडून सल्ला दिला जातो. आहार कोणता, केव्हा अन्‌ किती प्रमाणात घ्यावा, याबाबत वेळ अन्‌ प्रमाण नक्कीच ठरवता आले पाहिजे. आज पण याच विषयावर सविस्तर समजून घेणार आहोत. म्हणजे भात कीती अन्‌ कुणी खावा? मधाचे सेवन केव्हा अन्‌ किती करावे? मेथीचे दाणे केव्हा आणि कसे सेवन करावे? कुठलाही पदार्थ योग्य वेळी, योग्य प्रमाणात सेवन केल्यास नक्कीच आरोग्यासाठी फायदेशीर असतो. 

भात किती अन्‌ कुणी खावा?
सर्वात जास्त वापरले जाणारे धान्य म्हणजे पांढरा तांदूळ. तांदळाचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. आहारात भाताचे अधिक प्रमाण आजच्या जीवनशैलीत हानिकारक ठरू शकते. दिवसेंदिवस डायबिटीज आणि हृदयरुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामागचे एक कारण म्हणजे अधिक भाताचे सेवन. बैठे काम करणाऱ्यांसाठी भात हानिकारक ठरू शकतो. शारिरीकदृष्ट्या सतत सक्रिय असणाऱ्यांनीच आहारात नियमित भात खावा. नियमित भात खाणारे लठ्ठ  होतात. धूम्रपानाची सवय असेल तर हृदयविकाराचा धोकाही वाढतो. पूर्वीच्या काळात शरिरीक कष्ट, अनेक किलोमीटर पायी चालणे यामुळे पचनसंस्था सुरळीत राहत असे. सध्याच्या काळात अनेक सुखसोयींची साधणे असल्यामुळे शारिरीक कष्टच थांबले आहे. याचा परिणाम म्हणजे लोक लठ्ठपणा अन्‌ विविध आजारांच्या विळख्यात अडकत आहेत. 

मधाचे सेवन आरोग्यदायी
मध खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. लोह, कॅल्शियम, प्रथिने, पोटॅशियम, सोडियम, जीवनसत्त्वे ब आणि क अन्‌ कर्बोदके अशी पोषक घटक मधामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे नियमित मध सेवन केल्यास विविध आजार टाळता येतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. मध सेवनाने शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. शरीरातील सूज कमी होण्यासही मदत होते. मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असल्याने त्वचा अन्‌ केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा मध घेतल्यास सर्दी, खोकला, ताप या समस्या दूर होतात. कोमट पाण्यात मध मिसळून पिल्यास लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते. 

गुणकारी मेथी दाण्यांचे पाणी
एक ते दीड चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे. सकाळी उठून हे पाणी गाळून उपाशीपोटी प्यावे. उरलेल्या मेथीचे दाणे फेकून देण्याऐवजी या दाण्यांचा पुन्हा वापर करता येतो. मेथीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मेथीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. सकाळी मेथीदाण्यांचे पाणी प्यायल्याने शरीरातील दूषित घटक बाहेर पडतात. मेथीच्या दाण्यांचा उपयोग प्राचीन काळापासून मधुमेह नियंत्रणासाठी केला जातो. तसेच बद्धकोष्ठसारख्या समस्या नियंत्रणात ठेवता येतात. मेथी उष्ण असल्यामुळे प्रमाणातच वापर असावा. गर्भवती महिलांनी हा प्रकार टाळावा. 

- कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक निसर्ग अभ्यासक असून वरील लेख आयुर्वेदच्या आधारावर व सखोल अभ्यासातून माहिती म्हणून दिलेला आहे. अनुकरण करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली