विज्ञान-तंत्रज्ञान आणि भारत
एचके लर्निंग अँड एनएए : विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजेच विकास, असे समजायला काहीच हरकत नसावी. शारीरिक श्रमाने जे शक्य नाही ते विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे. राेज नवनवे शाेध लागत आहेत आणि आजचे तंत्रज्ञान उद्या जुने ठरत आहे. पन्नास वर्षांनंतरचे जीवन आपण कल्पनाही करू शकणार नाही, एवढे वेगळे असणार असल्याचे बोलले जाते. या प्रगतीत भारताची भूमिका महत्वाची असेल, हे वेगळे सांगायला नको. कुशाग्र बुद्धिमत्ता भारतातकडूनच उपलब्ध होईल. प्राचीन भारतीयांनी तेव्हा लावलेले शाेध आजही कालसुसंगत दिसतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा आधार म्हणजे गणित. यात भारत प्रथमपासून आघाडीवर आहे. महान गणितज्ञ आर्यभट्ट हे सर्वात मोठे उदाहरण म्हणून सांगता येईल. आर्यभट्ट यांनी संख्याप्रणाली (नंबरिंग सिस्टिम) शाेधली आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ‘शून्याचा शाेध लावला. संख्याप्रणाली आणि शून्य नसते, तर मानव आज चंद्रावर पाऊल टाकू शकला नसता आणि सुपर काॅम्प्युटर्सही अस्तित्वात येऊ शकले नसते.
भारताने दिले जगाला आयुर्वेद संपूर्ण जगाणे स्वीकारलेले आयुर्वेद ही भारताचीच देणगी आहे. आयुर्वेदाचा उगम पाच हजार वर्षांपेक्षा जुना असून, विविध महर्षी आणि ऋषींनी ताे विकसित केला. समाधानी जीवनासाठी जगभरात आयुर्वेदाचा वापर वाढताना दिसत आहे. आधुनिक काळातही भारतीय आयुर्वेदामध्ये प्रगतीचा ठसा उमटविताना दिसत आहेत. यासह भारत आज जगात विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे. त्यात प्रामुख्याने गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समावेश होतो गेल्या शतकभरात भारतीयांनी विज्ञानाच्या आघाडीवर माेठी प्रगती केल्याचे दिसते.
यूएसबी (युनिव्हर्सल सीरियल बस) मागील दाेन दशकांत माेठ्या प्रमाणात तांत्रिक बदल दिसून आले आहेत. त्यात डेटा ट्रान्सफरिंगने माेलाची भूमिका बजावली आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणातील डेटा साठवायची साेयसुद्धा कल्पना पलीकडचीच वाटते. त्यासाठी पाेर्टेबल स्टाेअरेज डिव्हाइस, यूएसबी आणि त्याच्या केबल्स अस्तित्वात आल्या. फाइल्स ट्रान्सफर करणे, यूएसबी स्टाेअरेज, चार्जिंग डिव्हाइस याशिवाय आपण कामच करू शकत नाही. या शाेधाचे श्रेय जाते भारतात जन्मलेले आणि आता अमेरिकेत असलेले अजय व्ही. भट्ट. अजय यांचा जन्म गुजरातमधील वडाेदरा येथे झाला. उच्च शिक्षणासाठी ते नंतर अमेरिकेत गेले. ‘इन्टेल काॅर्पाेरेशन’मधून त्यांनी कामाला प्रारंभ केला. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना युरोपीय इन्व्हेंटर अॅवाॅर्डने गौरविण्यात आले आहे.
द इन्टेल प्रिमियम चिप विनाेद धाम यांनी १९१३ मध्ये ‘इन्टेल’ची पहिली प्रिमियम चिप तयार केली. ‘पेन्टियमचे जनक असा उल्लेख केला जाणारे विनाेद धाम यांचे कार्यक्षेत्र सेमिकंड्नटर्सचे आहे. अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतल्यावर त्यांनी भाैतिकशास्त्राच्या ‘साॅलिड स्टेट्स’ या शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी जगातील सर्वांत वेगवान चिप तयार केली. ‘इन्टेल ग्रुप’ साेडला तेव्हा ते कंपनीच्या मायक्राेप्राेसेसर्स विभागाचे उपाध्यक्ष हाेते. आता ते ‘ने्नसजेन’ या स्टार्टअपमध्ये काम करतात.
चांद्रयान - १ चांद्रयान - १ या भारताच्या पहिल्या चंद्रकक्षीय माेहिमेमुळे भारताकडे टेकनॉलॉजीमध्ये प्रगत राष्ट्र म्हणून बघितले जात आहे. ल्युनार ऑर्बिटल मिशनमुळे भविष्यातील अनेक अवकाश माेहिमांची दारे खुली झाली असून, देशाच्या अवकाश कार्यक्रमाला बळ मिळाले आहे. ऑक्टॉबर २००८ मध्ये ‘चांद्रयान-१ ने उड्डाण केले आणि ऑगस्ट २००९ पर्यंत ते कार्यरत राहिले. या काळात वैज्ञानिक माहिती गाेळा करण्याचे काम झाले. चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू शाेधणे ही या यानाची सर्वांत माेलाची कामगिरी ठरली. पण दुर्दैवाने काही तांत्रिक बिघाडामुळे ऑगस्ट २००९ पासून ‘चांद्रयान-१ ’ला संदेश पाठविणे आणि त्याच्याकडून संदेश प्राप्त करणे थांबले. मात्र भविष्यात काय चुका टाळाव्यात हे समजणे या माेहिमेमुळे शक्य झाले.
फायबर ऑप्ट्निस जगातील सर्वाेच्च वेगाने डेटा ट्रान्सफर करणे शक्य झाले ते या फायबर ऑप्ट्निसच्या शाेधामुळेच. प्रकाशकिरणांच्या (लाइट रेज) वापराने सिग्नल्स निर्माण करून प्रकाशाच्या गतीने डेटा ट्रान्सफर केला जाताे. या शाेधामुळे एकीकडून दुसरीकडे वेगाने माहिती पाठविता येणे शक्य होते. या शाेधाचे जनक आहेत भारतीय वंशाचे अमेरिकन भाैतिकशास्त्रज्ञ नरिंदरसिंग कॅप्ने. फाॅर्च्युन’ मासिकातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘अनसंग हिराेज ऑफ ट्वेंविएथ सेंच्युरी’ या पारितषिकाचे नरिंदरसिंग हे मानकरी आहेत. विज्ञानाच्या जगात हे पारिताेषिक नाेबेल पारिताेषिकाच्या बराेबरीचे मानले जाते.
मेरा भारत महान..! हे घोषवाक्य अनेक भारतीयांनी सिद्ध केले आहे आणि करत आहेत. स्वतःच्या सर्वांगीण विकासासह देशविकासाचे हित जोपासत अनेक भारतीय जिद्द, चिकाटी घेऊन विविध क्षेत्रात यश प्रात करत आहेत. प्रत्येक भारतीयाने त्यांचा आदर्श घेणे अत्यंत गरजेचे आहे. घराच्या, गावाच्या, शहराच्या चौकटीतून बाहेर येऊन जगाचा अभ्यास केला तर भारतीय संपूर्ण जगात मोलाची भूमिका बजावताना दिसतील. यात आपलाही वाटा असावा असे प्रत्येकाला वाटायलाच हवे. त्यासाठी प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करण्यासाठी सकारात्मकता अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून सदैव विकासाचा ध्यास असावा म्हणजे स्वतःसह देशाचे नावही उज्जवल करणे शक्य होईल. (माहिती स्रोत इंटरनेट)
लेखक : कैलास एन. हिरोडकर
संपादक : एचके ब्लॉग
संचालक : एचके लर्निंग अँड एनएनए


खूप छान लेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद..! ब्लॉगवरील सर्वच लेख मार्गदर्शक आहेत...!
हटवा