कृतज्ञता एक सुंदर भावना..!


एचके लर्निंग अँड एनएए  :
आपले मन म्हणजे भाव-भावनांचा अथांग महासागरच..! निरंतर भाव-भावनांचे तरंग मनात उमटत असतात जे आपल्या वर्तनातून दिसून येतात. मनातील असंख्य भावनांपैकी एक भावना म्हणजे कृतज्ञता. मनाचे सौंदर्य याच भावनेतून अखंडित ठेवता येते. कुणीतरी जेव्हा आपली समस्या सोडवण्यासाठी पुढे येते, मदतीचा हात देते तेव्हा कृतज्ञता हे भाव आपोआपच आपल्या चेहऱ्यावर दिसतात. कृतज्ञता ही एक  सुंदर भावना आहे. कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे संबंधित व्यक्तीचे आभार मानणे, त्याच्या मदतीची जाण ठेवणे. ही भावना काेणाबाबतही असू शकते. तुमचा जाेडीदार, मित्र, घरातील सदस्य या प्रत्येकांबाबतीत ही भावना  सारखीच असायला हवी. आपण आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दलच कृतज्ञ होताना दिसत नाही. खरे तर असे व्हायला नको. आई, बाबा, पत्नी, मुलगा, जवळचे नातलग, मित्र यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या मदतीसाठी कृतज्ञ व्हायलाच पाहिजे. असे केल्यास नात्यातील गोडवा वाढून आयुष्यात आनंद पेरता येईल.  सध्याच्या धावपळीच्या काळात आपण कृतज्ञता व्यक्त करणंच विसरतोय..! दिवसभर आपल्यासाठी राबराब राबणाऱ्या आईला साधं धन्यवादही म्हटले जात नाही. कारण तो संस्कारच आपण लावून घेतलेला नसतो. यावर आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे.

अहंकार 
सर्वात मोठा शत्रू 
अहंकार मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे. हाच शत्रू मनावर अधिराज्य गाजवताना दिसतो. या शत्रूमुळेच कृतज्ञ या भावनेचा अंत होतो. म्हणून याकडे वेळीच लक्ष देता आले पाहिजे. जोवर मोठे संकट येत नाही तोवर सर्वशक्तिमान असल्याची खोटी भावना मनात घर करून असते. कोरोनासारख्या महामारीने या खोट्या अहंकाराचा पर्दाफाश केल्याचे  दिसून आले आहे. या संकट काळात कृतज्ञता या भावनेची जाणीव दिसायला लागली. व्यव्यहार सोडून माणुसकी जपता आली.  वर्ष २०२० विषासमान राहिले. या काळात मानवाची विविध रूपे अनुभवता आली. आपलं-परकं यातला फरक समजून घेता आला. अहंकारी मानवाच्या कानशिलात कोरोनामय चोपच निसर्गाने दिला. त्यातूनच अहंकाराला लगाम बसवणे श्यक्य झाले असावे.  कृतज्ञतेची भावना पुन्हा वाढीस लागल्याचे मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या पाहणीतही  दिसून आले आहे. कृतज्ञतेचा संबंध आपल्या आनंद आणि भावनिक आराेग्याबराेबरसुद्धा असल्याचे स्पष्ट होत आहे. इतरांबाबत नेहमी कृतज्ञ असलेले लाेक सकारात्मक असतात, ते सहकाऱ्यांना प्राेत्साहन देऊन त्यांची उत्पादनक्षमता वाढवितात आणि अशा लाेकांचे सर्वांबराेबर चांगले संबंधही वृद्धिंगत होतात.  अशा लाेकांचे भावनात्मक आराेग्य इतरांपेक्षा उत्तम असते आणि कसाेटीच्या प्रसंगांत ते याेग्य प्रकारे मार्गही  काढतात. म्हणून आजच, आताच कृतज्ञतेचा हा महाअलंकार मनावर चढवायला हवा.


बदलासाठी संकल्प हवा  
स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी संकल्प करायला हवा.  कृतज्ञता हा संस्कार आत्मसात करण्यासाठी तशी सवय लावायला हवी. त्यासाठी नम्रता अंगीकारून अहंकाराला त्यागायला हवे. कठीण आहे, मात्र अश्यक्य मुळीच नाही.  स्वतःला व्यक्त व्हायला शिकवावे लागेल. मनात आलेला प्रत्येक कृतज्ञ भाव बोलून दाखवावा लागेल. याची दैनंदिन जीवनात सवय केली तर  जीवनाची गुणवत्ता सुधारत जाईल. हा संकल्प म्हणजे तुम्ही स्वत:ला दिलेले वचन आणि  त्याचे काटेकोर पालन असेल. शुभारंभासाठी आयुष्यातील दाेन-तीन प्रसंगांत तुम्हाला मिळालेली मदत विचारात घ्या. त्याचा विचार करायला लागल्यावर आपाेआपच मनात कृतज्ञतेची भावना येऊ लागेल. मन शांत व्हायला लागेल आणि समाधान वाढत जाईल. यातूनच पुढे बदल घडत जाईल. अहंकाराच्या पाशातून मुक्ती प्राप्त होईल. जी आत्मानंद देणारी असेल. म्हणून कृतज्ञता एक सुंदर भावना तर आहेच, शिवाय हा एक अहंकारावर विजय प्राप्तीचा यशस्वी मार्गही आहे.  

नमस्काराणे होतो अहंकाराचा नाश  
अहंकारावर विजय प्राप्तीसाठी नमस्कार नावाचे शस्त्र धारण करायला हवे. हे असे शस्त्र आहे की, यामुळे अहंकाराचा नाश झालाच समजा. नमस्कार करण्याचा संस्कार हृदयात कृतज्ञतेची भावना निर्माण करतो. नमस्काराच्या स्थितीत जाेडलेले हात छातीला चिकटलेले असल्यामुळे कृतज्ञतेच्या भावनेची अनुभूती मिळते. आपण काेणाबाबत आणि कशासाठी कृतज्ञता व्यक्त करत आहाेत हे जाणून घ्यायला हवे. या स्थितीच्या चरम सीमेवर असताना आपल्याला आजवर जे काही मिळाले त्याबद्दल आभार मानता आले पाहिजे. यात मन निराकार, अदृश्य असते मनाची अवस्था शरीर दर्शवत असते. म्हणून मनासह आपल्या शरीरालाही हे भाव व्यक्त करता आले पाहिजे. आधी मनाने शरीराचे आणि शरीराने मनाचे कृतज्ञ असायला हवे. मनाने  शरीराला अदब शिकवणे  फार गरजेचे आहे.  शरीराने  सदैव साथ दिली आहे याचा मनालाही विसर पडता काम नये. आधी स्वत:बाबत कृतज्ञ असायला हवे.  ही भावना केवळ स्वत:बाबतच नकाे, तर तुमचा जाेडीदार, कुटुंबीय आणि समाजातील सर्वांबराेबरही बाळगायला हवी. या सर्वांबाबत कृतज्ञता बाळगल्याने आत्मिक शांतता प्राप्तीचा मार्ग नक्कीच मोकळा होतो.

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संपादक : एचके  ब्लॉग 
संचालक : एचके  लर्निंग अँड एनएनए 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.


 

टिप्पण्या

  1. हा लेख खरचं खूप प्रेरणा देणारा आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. दैनंदिन जीवनात व्यावहारिक उपयुक्तता असलेला व मनामनाच्या संवादात सातत्य राखणारा कृतज्ञता भाव.सुंदर लेखाबद्दल धन्यवाद 🙏.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद..! डॉ. रमेशजी...
      अहंपणा गोंजारत गोंजरत कृतज्ञता भाव विसरताना लोक दिसतात. लोक म्हणण्यापेक्षा आपल्याच माणसांच्या मनातून कृतज्ञतेची भावना लुप्त पावत चाललेली आहे. याची जाणीव व्हायला हवी...! एवढाच लेखातून प्रामाणिक प्रयत्न..!

      हटवा
  3. निष्ठूर, अहंकारी, गर्विष्ठ अशा मनांचं परिवर्तन घडवून आणणारा लेख आहे... कृतज्ञता भाव जपता आल्या पाहिजे. त्यासाठी हा लेख खूपच मार्गदर्शक ठरतो... लेख वाचन करताना मीच कुठेतरी कृतज्ञभाव विसरत चाललोय असं जाणवलं... लेख वाचन झाल्यावर आधी मी माझ्या आई-वडिलांविषयी प्रत्यक्ष जाऊन कृतज्ञ झालो... लेखकांचे मनपासून धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली