टेक्निकल इंडिकेटर्स आणि मार्केट

एचके लर्निंग अँड एनएए :

शेअर बाजार म्हणजे तरुणांपासून तर वृद्धांपर्यंत एक आकर्षण बनत आहे. घरात, ऑफिसमध्ये, कॉलेज कट्ट्यावर शेअर बाजाराविषयी चर्चा रंगतांना दिसते. आता म्हणायला हरकत नाही, की देश खरंच शिक्षित आणि इकॉनोमीकल बनत आहे. दोन दशके मागे पहिले तर असे लक्षात येते की, शेअर बाजारापासून लोक लांबच राहत होती. त्याला कारणं पण तशीच होती. सर्वात मोठे कारण म्हणजे पारदर्शकतेचा अभाव. मात्र आज खुल्या आकाशासारखा शेअर बाजार निरभ्र  आहे. दिवसभरातील आर्थिक व्यवहार एक्सचेंज बोर्डच्या अधिकृत संकेत स्थळावर रात्री 8 नंतर प्रसिद्ध केला जातो. जगातील एकमेव पारदर्शक बिझनेस असेल तर तो शेअर बाजारच म्हणावा लागेल, असे जरी असले, तरी शेअर बाजारात काम करणे एवढे सोपे सुद्धा नाही. येथे काम करण्यासाठी सर्वप्रथम इच्छाशक्ती आणि पैसा म्हणजेच भांडवल असणे गरजेचे आहे. समजा या दोन्ही गोष्टी उपलब्ध असल्या तरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेअर बाजाराचा टेक्निकल अभ्यास..! याशिवाय शेअर बाजारात काम करणे म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून मार्ग शोधण्यासारखेच होईल. या लेखात आपण यावरच सविस्तर समजून घेणार आहोत.  अंदाज नको खात्री हवी
शेअर बाजारात 50 टक्के लोक अंदाज बांधूनच काम करताना दिसतात. 10 टक्के लोक इकडून-तिकडून  टिप्स घेऊन काम करतात. पाच टक्के लोक डोळे मिटून फटके मारत काम करतात जे लवकरच शेअर बाजाराला दोष देत कायमचे काम सोडून देतात. अजून 5 टक्के लोक सट्टा खेळावा तसे व्यवहार करत बरबाद होतात. उरलेले 30 टक्के लोक बिझनेसमेन होतात आणि शेअर बाजारात टिकून राहतात. नुसते टिकूनच राहत नाही तर यशस्वी इन्व्हेस्टर आणि ट्रेडरही होतात. पुढे जाऊन हेच लोक इतरांसाठी मार्गदर्शक बनतात. कुटुंबाला आर्थिक समृद्धी देत, पुढील पिढीला हाच व्यवसाय सोपवतात. हे यश..! अंदाज, फटके किंवा सट्टेबाज वृत्तीतून मिळालेले नसते. तर यापाठीमागे कठोर तप असते. यासाठी तासंतास शेअर बाजार अभ्यासावा लागतो. मगच यशप्राप्ती होते. सर्वांनाच टेक्निकल अभ्यासणे शक्य नसते. तेवढा वेळही नसतो. हा अभ्यास कसा करावा आणि कुठे उपलब्ध होतो याची माहितीही नसते. किंवा माहिती करून घेण्याची इच्छाही नसते. अश्या वेळेस जाणकार संस्थेचा आधार घेणे आर्थिक हिताचे ठरते. यासाठी 'एचके लर्निंग अँड एनएए' ही संस्था योग्य पर्याय आहे. ही संस्था आपले डिमॅट हाताळण्याचे काम करते. सखोल टेक्निकल अभ्यासातून आपल्या डिमॅट खात्यात शेअर्स खरेदी होतात आणि उत्तम परताव्यासह विक्री करून भरघोस उत्पन्न काढून दिले जाते. यासाठी प्रॉफिटवर काही टक्के सर्व्हिस चार्ज आकारला जातो. वर्षभरात चार ते पाच वेळा हमखास प्रॉफिट काढून  दिले जाते..! आपणासही  https://hklearning-naa.blogspot.com या ब्लॉगवर रजिस्ट्रेशन करून शेअर बाजारासह विविध विषयांवर सविस्तर माहितीही मिळवता येईल. चला तर मग शेअर बाजारात काम करण्यासाठी महत्वाच्या टेक्निकल इंडिकेटर्स विषयी जाणून घेऊया.

MOVING AVERAGE (मूव्हिंग एव्हरेज)
एखाद्या शेअरच्या वा निर्देशांकाच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार होत असतील तर त्याचा ट्रेंड/ दिशा ठरविणे कठीण होते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मूव्हींग एवरेज या इंडिकेटरचा वापर होतो. मूव्हींग एवरेज म्हणजे एका ठराविक कालावधीसाठी त्या शेअरच्या किंवा निर्देशांकाच्या बंद भावांची सरासरी. उदा.15 दिवसांच्या पिरिअडचे मूव्हींग एवरेज म्हणजे त्या 15 दिवसांच्या बंद भावांची सरासरी होय. अशा पध्दतीने प्राप्त सरासरी किंमतीचा ग्राफ काढला जातो आणि त्यावरून त्या शेअरची दिशा ठरवली जाते. कालावधी जेवढा जास्त तेवढा हा ग्राफ कमी चढ-उतार असलेला असतो आणि यामुळे तात्पुरत्या वरखाली होणाऱ्या किंमतीमुळे होणारी दिशाभूल टाळणे शक्य होते. मूव्हींग एवरेजचा सर्वात सोपा अर्थ म्हणजे, एखाद्या शेअरची वा कमोडिटीची किंवा निर्देशांकाची  एखाद्या ठराविक काळापूरती सरासरी किंमत होय. हा ठराविक काळ किती असावा, हे अर्थातच अपापल्या अनुभवाने  ठरवता येते.

MACD  (मूव्हींग एवरेज कनवर्जन डायवर्जन) एमएसीडी म्हणजे मूव्हींग एवरेजे कनवर्जन डायवर्जन. शेअरच्या किमतीच्या चढ-उतारतील दोन किमतींच्या सरासरीमधील संबंध दर्शविला जातो.  26 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हींग एवरेज (EMA) आणि 12 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हींग एवरेज (EMA)  यांच्या फरकाने एमएसीडी काढला जातो. त्या फरकाने तयार होणारी लाईन म्हणजे एमएसीडी लाईन असते.  9 दिवसांची एमएससीडी लाईन (EMA ) म्हणजे सिग्नल लाईन. या दोन्ही लाईन  एकत्र चार्टमध्ये ड्रॉ केल्यानंतर सिग्नल लाईन हे खरेदी किंवा विक्रीसाठी ट्रिगर म्हणून काम करते. अजून एक लाईन असते ती अगदी मधोमध स्थित असते. तिला झिरो लाईन म्हणतात. झिरो लाईनवर व्हॉल्युमसारखे काही बार दर्शविलेले असतात. त्यांना हिस्टोग्राम असे म्हणतात. हे डायव्हर्जन अचूकतेने दर्शवितात. एमएसीडी हा ट्रेंड फॉलो इंडिकेटर आहे, त्यामुळे एका दिशेने जाणाऱ्या मार्केटमध्ये हा जास्त अचूकतेने काम करतो. जेव्हा एमएसीडी लाईन ही सिग्नल लाईनला खालून वरती ओलांडते तेव्हा खरेदीचा सिग्नल मिळतो. यालाच पॉझिटिव्ह क्रॉसोवर (BULLISH CROSSOVER) असे म्हणतात.  याउलट जेव्हा एमएसीडी लाईन सिग्नल लाईनला वरतून खालच्या बाजूला ओलांडते तेव्हा विक्रीसाठीचा सिग्नल मिळतो. यालाच निगेटिव्ह क्रॉसओव्हर (BEARISH CROSSOVER) असे म्हणतात. 

RSI (रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स)
रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स हा (RSI)  0 ते 100 या रेंजमध्ये फिरत असतो.  हा 100 च्या वर आणि 0 च्या खाली जात नाही. महत्वाचे 3 स्तर असतात  30 , 50, 70. RSI मधील 50 ते 100 च्या झोनला बुलिश झोन तर 0 ते 50 ला बियरीश झोन समजले जाते.  RSI 70 च्यावर असल्यास संबंधित शेअर हा Overbought किंवा महाग झाला असे समजतात, आणि 30 च्या खाली गेली तर Oversold किंवा स्वस्त झाला असे समजतात. जर RSI 80 च्या वर गेला तर त्याला EXTREME Overbought किंवा अतिमहाग आणि 20 च्या खाली आला तर EXTREME Oversold किंवा अतिस्वस्त झाला असे मानतात . RSI 70 च्या वर जाऊन रेसिस्टन्स तयार करून, मार्केट पुन्हा माघारी फिरले तर अशी अवस्था विक्री साठी योग्य समजावी. अगदी तसेच OVERSOLD विषयीही लक्षात असू द्यावे. RSI जर 50 च्या आसपास फिरत असेल तर मार्केट SIDEWAYS आहे, असे समजावे . येथे एक महत्वाची बाब अशी आहे की, आपल्याला महाग किंवा स्वस्त असल्याची सूचना तर मिळते, मात्र आणखी किती काळ ही अवस्था राहणार, आणि नेमका कधी ट्रेन्ड रिवर्सल होणार, ते मात्र निश्चित ठरवता येत नाही. अशा अवस्थेत सेल साईडचा ट्रेड टाळायला हवा. मात्र जेव्हा आरएसआय 20 च्या खाली असतो तेव्हा टप्प्याटप्प्याने खरेदी करणे आर्थिक हिताचे ठरते. मात्र शेअर्स दर्जेदार, टेक्निकल, फन्डामेन्टल मजबूत कंपनीचाच असावा.

SUPERTREND (सुपरट्रेंड)
सुपरट्रेंड हा  एमएसीडी (MACD) आणि मूव्हिंग एवरेजप्रमाणे ट्रेंडच्या दिशेने जाणारा इंडिकेटर आहे. त्यामुळे एका दिशेने जाणाऱ्या मार्केटमध्ये हा अतिशय उत्तम पद्धतीने काम करतो. सुपर ट्रेंड हा एक असा टेक्नीकल इंडिकेटर आहे जो समजायला अतिशय सोपा आहे.  टेक्निकल अनालिसिस समजत नसेल तरीही  सुपर ट्रेंडचा उपयोग करून चांगला नफा काढता येतो. शेअर मार्केट, फ्युचर मार्केट, कमोडिटी मार्केट व फॉरेक्स मार्केट यापैकी कोणत्याही मार्केटमध्ये सुपरट्रेंडचा उपयोग करता येतो. यामध्ये कुठे खरेदी करायची, कुठे विक्री करायची, कुठे स्टॉपलॉस लावायचा आणि कुठे नफा घेऊन बाहेर पडायचे या सर्वांची माहिती मिळते. सुपरट्रेंड इंडिकेटरमध्ये दोन रेषा हिरव्या आणि लाल रंगात दर्शविलेल्या जातात. हिरवी रंगाची रेष  तेजी तर लाल रंगाची रेष मंदी दर्शवते. रेषेचा रंग हिरवा असेल तर तो खरेदीचा सिग्नल आहे. आणि जी रेषा लेवल दर्शवते तो स्टॉपलॉस समजावा. जस मार्केट वर जाईल तसा तुमचा स्टॉपलॉसही वरवर जाईल. जोपर्यंत तुमचा ट्रेंलिंग स्टॉपलॉस हिट होत नाही, तोपर्यंत तुमचे टार्गेट ओपन असते. याचप्रमाणे जेव्हा रेषेचा रंग लाल असेल तर तो विक्रीचा सिग्नल समजावा. ही अवस्था अगदी खरेदी सिग्नलच्या उलट असेल.  

मित्रांनो..!, हा विषय येथेच थांबवूया, शेअर बाजारावर सखोल अभ्यासातून आपले मार्गदर्शन सुरूच राहणार आहे. पुन्हा भेटूया एक नवीन विषयासह, तोपर्यंत आपला निरोप घेतो. आणि हो ब्लॉग शेअर करायला विसरू नका...! इतरांनाही ब्लॉगचा लाभ होऊ द्या...! धन्यवाद..!

लेखक : कैलास एन. हिरोडकर 
संचालक : एचके लर्निंग अँड एनएए
लेखक शेअर बाजारातील अभ्यासक व स्वतंत्र विश्‍लेषक असून हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ट्रेडिंग करताना आपणही स्वत: टेक्निकल अभ्यास करत खात्री करून घ्यावी. 


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट द्या. 8149347309/ 7887380556 वर संपर्क साधा.


 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली