भोवतालचे आश्‍चर्य अन्‌ नवल..!


एचके लर्निंग अँड एनएए :
आपल्या भोवताली असे काही असते की, त्यामुळे आश्‍चर्य आणि नवलच वाटते. हे आश्‍चर्य अन्‌ नवल जाणून घेण्यासाठी आतुरताही तेवढीच वाढत जाते. आता हेच बघाना..! स्त्रियांपेक्षा पुरुषांनाच चावतात डास..! अन्‌ विशेष म्हणजे फिमेल डासच..! 2 लाख 70 हजाराचा एकच आंबा..!, अरे बाबरे..! किती हा बहुउपयोगी टुथ पेस्ट..! वाढलीना या नवलाई जाणून घेण्याची उत्सुकता. चला तर मग या नवलाईंबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. कदाचीत याच नवलाई आपल्या उपयोगी पडू शकतात. 

स्त्रियांपेक्षा पुरुषांनाच चावतात डास
स्त्रियांपेक्षा पुरुषांना डास जास्त चावतात. हो हे खर आहे..! एका संशोधनातून हे समोर आले आहे. यामागे वैज्ञानिक कारणही तसेच आहे. घामामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साइडकडे डास आकर्षित होतात. पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक स्वच्छ असतात. घामाचा वास डासांना पुरुषांकडे आकर्षित करतो त्यामुळे डास पुरुषांना अधिक चावतात. आणि हो आश्‍चर्यकारक म्हणजे फक्त फिमेल डासच पुरुषांना चावते. मानवी रक्ताच्या साहाय्याने फिमेल डासांच्या गर्भातील अंडीत वाढ होते. फिमेल डाससाठी मानवी रक्त प्रोटीनसारखेच काम करते. आता बोला..! 

काय? २ लाख ७० हजाराचा आंबा
रसाळ आंबे आणि त्यासाठी ग्राहकांची गर्दी हे नित्याचेच..! या रसाळ आंब्यांची चव चाखण्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमतही मोजली जाते.   ‘अका मियाझकी मँगो’ हा जगातील सगळ्यात महागडा आंबा आहे. जपानमधील ‘मियाझकी’ शहरात या आंब्याचे उत्पादन केले जाते. या मियाझकी मँगोची किंमत 2 लाख 70 हजार एवढी आहे. डायनासोरच्या अंड्यासारख्या आकारच्या या आंब्यांना ‘ड्रॅगन एग’ या नावानेही ओळखले जाते. 350 ग्रॅम वचनाच्या या आंब्यात 15 टक्के शुगरचे प्रमाण आहे. भारतात मध्यप्रदेशमधील जबलपूरमध्ये या आंब्याचे उत्पादन घेतले जाते. या आंब्याचा रंग सुरूवातीला जांभळा दिसतो. नंतर तो गडद लाल होत जातो.

किती हा बहुउपयोगी टुथ पेस्ट..!
टुथपेस्टचा दात स्वच्छ करणे एवढाच उपयोग आपल्याला माहिती असेल. मात्र टुथपेस्टचे अनेक उपयोग असल्याचे सिद्ध झाले आहे. लॅपटॉप, मोबाईल किंवा टीव्ही स्क्रिनवरील स्क्रॅच मार्क टूथपेस्टने सहज निघतात. चांदीवरील काळपटपणा काढण्यासाठी टूथपेस्टचा वापर होतो. भिंतीवरील खडूचे डाग, बुटाच्या रबरी सोलवरचे डाग, चामड्याच्या जॅकेट किंवा पर्सवरचे डागही टूथपेस्टने काढले जातात. इस्त्रीची प्लेट खराब झाली असेल 
तर टूथपेस्ट लावून घासल्याने प्लेट अगदी चकाचक होते. कार्पेटवरील डागही टूथपेस्ट आणि ब्रशचा वापर करुन साफ करता येतात. कांदा आणि लसूण चिरल्यानंतर हाताला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी टूथपेस्टने हात स्वच्छ करतात. पाहिलत..! एकच टूथपेस्ट किती ठिकाणी वापरता येतो..!
 

कैलास एन. हिरोडकर संपादक : एचके ब्लॉग संचालक : एचके लर्निंग अँड एनएए


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!