प्रेरित 'लाल सिंग चड्ढा'
'लाल सिंग चड्ढा' हे व्यक्तीचे नाव..! या नावावरून चित्रपट काढण्यात येतो हेच एक विशेष म्हणावे लागेल. समाजातील विशिष्ट घटकांना प्रेरणादायी ठरावेत असे अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यातलाच हा एक प्रकार..! चला तर मग, चित्रपटाची संकल्पना नक्की काय आहे? हे जाणून घेऊया. लेखक "विन्स्टन ग्रूम" यांची कादंबरी "फॉरेस्ट गंप (1986)" वर आधारित १९९४ साली हॉलिवूडमध्ये प्रदर्शित झालेल्या "फॉरेस्ट गंप" या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता 'टॉम हँक्स' याने मुख्य पात्र साकारले आहे. आणि यावरूनच प्रेरित होऊन अभिनेता आमिर खानने 'लाल सिंग चड्ढा'ची निर्मिती केली आहे. 'रिमेक' म्हणजे "पुन्हा निर्मिती" हा शब्दश: अर्थ जरी असला तरी मनातील भावना आणि परिस्थिती याचा रिमेक करता येत नाही. हेच या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्यामुळेच हा चित्रपट बघणे हा एक नवीन अनुभव ठरू शकतो. आता वळूया या चित्रपटाच्या ट्रेलरकडे!
शाळेत जाणारा मुलगा ज्याच्या दोन्ही पायांना पोलियोने विळखा घातला आहे. आधाराच्या सहाय्याने तो चालतो. शिक्षक त्या मुलाच्या आईला सांगतात, की तुमचा मुलगा नॉर्मल (सामान्य) नाही. त्याचा (IQ) बुद्धीमत्ता कमी आहे. मात्र आई ती आईच..! अशक्य ते शक्य करून दाखवण्याची ताकद म्हणजेच जिद्द, चिकाटी..! हीच जिद्द, चिकाटी ती आई आपल्या मुलात निर्माण करते. ती त्याला सांगते, कि तू इतर मुलांसारखाच नॉर्मल आहेस आणि तू ठरवले तर सर्व काही करू शकतो. म्हणून जग काय म्हणतंय ते दुर्लक्षित कर. आणि यश गाठण्यासाठी तयार हो. तू सर्व समर्थ आहेस, तुला कुणाच्याही मदतीची गरज भासायला नको. हीच प्रेरणा त्या मुलाला अशक्य ते शक्य करण्यास कारणीभूत ठरते. आई त्याला सक्षम करण्यास सज्जच असते. आई-मुलामधील हा संवाद प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजल्याशिवाय राहत नाही. जीवनात चमत्कार होतात ते असेच.
आईमूळे प्रेप्रीत झालेला तो पोलियोग्रस्त मुलगा सर्व बंधने तोडून पळू लागतो. असा पळतो की थेट धावण्याच्या स्पर्धेत प्रथम येतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक घटनांचे वादळ चालूच असते. अनेक प्रकारची संकटे पार करत आपण नार्मल आहोत हे जगाला कृतीमधून दाखवून देतो. मग ती मैत्री असू दे, युद्धात एखाद्याचे प्राण वाचवणे असू दे किंवा प्रेम करणे या सर्व गोष्टी तो त्याच्या मनाप्रमाणे आणि आनंदाने करतो. खरेतर, कोण नॉर्मल कोण नॉर्मल नाही हे ठरवणारे लोक कोण? हा प्रश्न अप्रत्यक्षरित्या यातून विचारण्यात आला आहे. तुमचे आयुष्य हे लोकांच्या निर्णयावर अवलंबून आहे काय? किंवा तुम्ही जे आहात ते जर लोकांना मान्य नसेल, तर तो त्रास तुम्हाला आयुष्यात कुठे नेऊ शकतो, हे या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.
मानवी मनातील भाव-भावनांचा खेळ यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट. त्यामुळे बघताना नकळतपणे जर डोळ्यात पाणी आले तरच या चित्रपटाची दुसरी बाजू तुमच्या समोर येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी आमिर खान सोबत आधी देखील काम केले आहे. जसे की "तारे जमीन पर" "धोबी घाट", "सिक्रेट सुपरस्टार" या प्रकारचे हटके चित्रपट दिग्दर्शनामध्ये यांचा हात आहे. यामुळे 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित झल्यावर आमिर खान बॉक्स ऑफिस वर "दंगल" करणार की फक्त "रिमेक" ऐकून प्रेक्षक या चित्रपटाचे "पानिपत" करणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
लेखक चित्रपट समीक्षक आहेत.
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581


वरील लेख व केलेली समीक्षा खूप छान आहे. चित्रपट का बघावा हे आपण थोडक्या शब्दात चित्रपटाबद्दल खूप छान माहिती दिली आहे .
उत्तर द्याहटवाखूप छान समालोचन केलं आहे trailer चे. चित्रपट का पाहावं हे समजले.
उत्तर द्याहटवाMst👍👍👍👍
उत्तर द्याहटवाMst megnil bhau👍👍👍
उत्तर द्याहटवा