हिट होण्यासाठी फिट व्हा..!
'हिट होण्यासाठी फिट व्हा' हा महामंत्र आपल्या हितचिंतकांकडून मिळतच असतो. मात्र आपण या महामंत्राचा गांभीर्याने विचार करून अनुकरण करतो का, हा महत्वाचा मुद्दा आहे. यश, सन्मान, कीर्तीसाठी प्रत्येकजन आयुष्यभर प्रयत्नशील असतो. हे सर्व प्राप्तिसाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ असणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण अशाच मौल्यवाण उपायांवर चर्चा करणार आहोत ज्यामुळे ठरवलेले लक्ष साध्य करण्यास मदत होईल. आणि हो..! ठरवले तर आपण हे उपाय नक्कीच करू शकतो. जसे सायकलिंग, दोरी उड्या, डान्स, हास्य, शिष्टाचार आणि वाचन हे सर्व नियमित करण्याचे ठरवल्यास आपण हिटही व्हाल आणि फिटही राहाल. चला तर यावर पुढे सविस्तर चर्चा करूयात.
सायकलिंग सर्वोत्तम उपाय
स्वस्थ राहण्यासाठी सायकलिंग एक सर्वोत्तम उपाय म्हणून पहिले जाते. दररोज 30 मिनिटे सायकल चालवल्याने रात्री चांगली झोप लागते. मेंदू अधिक सक्रिय होतो. रोगप्रतिकारकता उत्तम राहते. शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात. हृदयरोग, स्ट्रोक, कर्करोग आणि मधुमेह यासारखे आजारही होत नाही. म्हणून जास्तीत जास्त सायकलचा वापर करायला हवा. विशेष म्हणजे यामुळे प्रदुषणही टाळता येते आणि पेट्रोलचा खर्च कमी होऊन आपली आर्थिक बचतही होते.
दोरीच्या उड्या आणि धावणे
तंदुरूस्त राहण्यासाठी दोरीच्या उड्या हाही एक चांगला आणि परिपूर्ण व्यायम समजला जातो. या प्रकाराने संपूर्ण अंगाची हालचाल होते. कॅलरीज लवकर बर्न होतात, मांसपेशी, हाडे मजबूत राहतात. हृदयही व्यवस्थित कार्यशील राहते. वजन नियंत्रणात ठेवता येते. 10 मिनिटे दोरीच्या उड्या मारणे हे 8-10 मैल धावण्यासारखेच आहे. मात्र ज्यांना हृदयाच्या समस्या, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी दोरीच्या उड्या मारू नयेत. मात्र असे रुग्ण धावू शकतात. धावल्यानेही शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. स्नायू मजबूत होतात, हृदय तसेच पचनसंस्था निरोगी राहते.
डान्स आंनंदप्राप्तीचा उत्तम मार्ग
डान्स मन मनप्रसन्नतेसाठी सर्वोत्तम उपाय आहे. शिवाय शारीरिक बळकटीसाठी तज्ञांकडून डान्स किंवा इतर प्रकारचे नृत्य करण्यासाठी सांगितले जाते. डान्स केल्याने शारीरीक आरोग्य तर सुधारतेच शिवाय मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. वाढलेले वजनही कमी होण्यास मदत होते. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मन आनंदी, उत्साही, प्रसन्न राहते. स्मरणशक्ती वाढते. शरीरात लवचिकता निर्माण होऊन शरीराच्या वेदनाही कमी होतात. ताण-तणाव दुर करण्यासाठी डान्स हा उत्तम पर्याय असल्याचे सिद्ध होत आहे.
हास्य एक उत्तम याेगसाधना
हास्यामुळे शरीरातील नसा माेकळ्या हाेऊन रक्ताभिसरण उत्तम होते. मानसिक तणाव दूर हाेतात. करिअरची काळजी, काैटुंबिक जबाबदाऱ्या, कामाचा वाढता व्याप, वेळेची कमतरता, दुरावलेली नाती यामुळे एकाकीपणा वाढत जातो. उदासीनतेमुळे मनावर विपरीत परिणाम होतो. वाढत्या महत्त्वाकांक्षांमुळे चेहऱ्यावरील हास्य दुर्मीळ हाेऊ लागले; मात्र या मनोविकारांवर हास्य उत्तम आणि माेफत उपचार आहे. हास्यामुळे राेगप्रतिकारशक्ती वाढते. प्राणवायूचे प्रमाण वाढून फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात. गंभीर विकारांमुळे आजारी असलेल्यांना उभारी देण्यासाठी ‘लाफ्टर थेरपी’ उपयाेगी पडत असल्याचे समोर आले आहे. विषेश म्हणजे, आपले शरीर नैसर्गिक आणि कृत्रिम हास्यातील फरक ओळखू शकत नाही म्हणुन अकारण हासलाे तरी त्याचे चांगलेच परिणाम होतात.
माेबाइल वापरताना शिष्टाचार हवाच
मोबाईल हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे. आधुनिक युग हे डिजिटल बनत आहे. म्हणून मोबाईल आणि उपलब्ध टेक्नॉलॉजीचा वापर होणारच; मात्र यासाठी काही नियम आणि शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे. अन्यथा हीच टेक्नॉलॉजी अभिशाप बनू शकते. माेबाइल आपल्यासाठी खूप उपयाेगी आहे हे नाकारता येणार नाही; परंतु कुठेही आणि केव्हाही त्याचा उपयाेग करणे त्रासदायक ठरू शकते. पायी चालताना, रस्ता ओलांडताना मोबाईलचा वापर धोकेदायक ठरू शकतो. गाडी चालवितानाही मोबाईलचा वापर टाळायला हवा. सर्वात महत्वाचे म्हणजे ईयरफाेन टाळणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे मनोविकार वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. मेंदूवर विपरीत परिणामही होत आहेत. ऑफिस मीटिंगमध्ये माेबाइलवर बाेलणे टाळायलाच हवे. आपल्यासोबत कुणी असेल तर त्यावेळी मोबाईल चुकूनही वापरू नये, हे खुपच वाईट आहे. यामुळे संवाद थांबून गैरसमज वाढण्याची शक्यताही वाढते.
मानसिक फिटनेससाठी हवे वाचन
वाचन मानसिक आरोग्य फिट ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. आपले मन म्हणजे भाव-भावनांचा अथांग महासागरच म्हणावे लागेल. अनंत विचारांचा कोलाहल मनात सतत असतोच. विचार सकारात्मक असतील तर उत्तमच; मात्र विचार नकारात्मक असतील तर अस्थिरता आणि उदासीनता मनाला मानसिक रुग्ण बनवत जाते. म्हणून सतत मन प्रसन्न करणारे वाचन व्हायला हवे. सुविचार हे मनाचे सर्वोत्तम आहार मानले जाते . आयुष्यात यशस्वी आणि सुखाचा महासोहळा अनुभवायचा असेल, तर नियमित यशोगाथा आणि सकारात्मक वाचन व्हायला हवे. त्यातुन प्रेरणा आणि उत्साह वृद्धिंगत होऊन ध्येयप्राप्ती झालीच समजा. मग..! प्रिय, वाचकांनो लेख येथेच संपवतो; मात्र आपण सर्वानी आताच हिट होण्यासाठी फिटनेस ठेवण्याचा संकल्प करूयात...!


Very 👍👍
उत्तर द्याहटवा