भाव-भावनांचा 'विक्रम'
चित्रपट कुठलाही असो, तो का पाहावा? यासंदर्भात चित्रपट निर्माता प्रेक्षकांची मानसिकता आपल्या निर्मितीमध्ये उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. काहीतरी प्रेक्षकांसाठी नावीन्य असावे, अशा नवनव्या कल्पनांना आपल्या सुपीक डोक्यातुन चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करतो. दिग्दर्शक लोकेश कानगराज यांनी विक्रम या चित्रपटाद्वारे विविध भाव-भावनांची निर्मिती प्रेक्षकांसमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. चित्रपट खून याभोवती फिरत असतो. पण का, कोण आणि कशासाठी हे सस्पेन्स प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारेच ठरते. चित्रपट पाहताना अंदाज मांडणे एवढेच प्रेक्षकांच्या हाती उरते. प्रत्येक वेळेस अंदाज चुकतात आणि समोर अजून नवे प्रश्न आणि नवे अंदाज...! चला तर मग, पुढे चित्रपट कसा सस्पेन्स, थ्रिलर, ऍक्शन आणि उत्सुकता वाढविणाऱ्या घटनांनी भरलेला आहे ते पाहूया..!
चित्रपटाची सुरवात होते चेन्नई या शहरातून..! शहरामध्ये एकापाठोपाठ एक खुनांचे सत्र सुरू होते. खून करणारे खून का करत आहोत याचे स्पष्टीकरण एका विडिओद्वारे देत असतात. "हा व्यवस्थेविरुद्धाचा लढा असल्याचा इशारा असतो. या खुन करणाऱ्या "मास्क गँग" ला पकडण्यासाठी पोलिस यंत्रणेव्दारे एक टीम नियुक्त केली जाते. कुठलेही नियम न पाळता ही टीम त्यांच्या पद्धतीने काम करणार असते. अचानकपणे चित्रपट वेगळेच वळण घेतो आणि चोरी झालेल्या कंटेनरचा शोध सुरु होतो. शहरातील मोठे नेते, बिझनेस मॅन व त्यांचा हीरो "चंदन" हे सर्व त्या कंटेनरला शोधण्याचा प्रयत्न करत असतात.
एका बाजूला खुनांचे सत्र तर चालूच असते; परंतु दुसऱ्या बाजूला एक कंटेनर हरवला आहे व त्यात नक्की काय आहे? आणि शहरातील सर्वच पोलिस नक्की कशाचा शोध घेत आहे हे देखील कुणालाच समजत नाही. सर्वकाही सस्पेन्स आणि महागोंधळच वाटायला लागतो. या सर्व घटना इतक्या वेगात घडत असतात की चित्रपटाचा मध्यांतर होईपर्यंत प्रेक्षकांना नक्की याची कथा काय? हाच एक प्रश्न असतो. प्रेक्षक चित्रपटात पुढे काय असेल याचा अंदाज मांडण्यात गुंतून राहतात. हीच कथेची एक दमदार बाजू म्हणावी लागेल. कारण येथे जेवढे अंदाज मांडले जाणार तेवढा गोंधळ वाढणार असतो. कमल हसन, फहद फसिल (एजेंट अमर) आणि विजय सेथुपती (चंदन) नक्की हे तिघे कोण आहेत? यांचा एकमेकासोबत नक्की काय संबंध आहे? भूतकाळात अशा काही घटना घडल्या आहेत, की ज्यामुळे आयुष्यात 'हीरो' पेक्षा 'व्हिलन' महत्त्वाचा वाटतोय. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या कंटेनरमध्ये असं काय आहे की, जे बाहेर आले तर जगावर काय परिणाम होऊ शकतो? तसेच कमल हसनच्या आयुष्यात भूतकाळात झालेल्या घटना, घोंगावनारी संकटी वादळं याच रहस्य नेमकं काय ? या सर्व प्रश्नांची उत्तर प्रेक्षक आपापल्या कल्पनेने शोधायला लागतात.
वरवर साधी दिसणारी हि कथा अनेक गुंतागुंतीची असून यात प्रेम, माया, हिंसा, धोका, हिंम्मत, कपटीपणा या सर्व भाव-भावनांचा हृदयस्पर्शी खेळ मनाला विविध अवस्थेत नेऊन सोडतो. अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर अजूनपर्यंत ज्यांनी कमल हसन यांना मोठ्या पडद्यावर बघितले नाही, त्यांनी नक्कीच हा चित्रपट पाहावा. यांनी पुन्हा एकदा आपली दमदार भूमिका या चित्रपटात साकारून सिद्धता प्राप्त केल्याचे स्पष्ट होते. अभिनयाचे बारकावे, संवाद कौशल्य, देहबोली यातून अभिनयाची जादूच कमल हसन यांनी प्रेक्षकांसमोर मांडली आहे. ज्यावेळी कमल हसन पडदयावर येतात त्यावेळी आपणदेखील कमल हसनच आहोत, असे वाटायला लागते आणि हीच खरी त्यांच्या अभिनयाची जादू म्हणावी लागेल. विजय सेथूपथी व फहद फासिल यांच्या अभिनयाने चित्रपटाची दुसरी बाजू पुरेपुर उचलून धरली आहे. संगीतकार अनिरुद्धचे संगीत, ऍक्शन सीन हृदयापर्यंत भिडतात .
चित्रपटात उणीव आहे ती एकच...! शेवटच्या काही दृश्यांमध्ये जो ऍक्शनचा अतिरेक झाला आहे तो जरा जास्तच आणि कल्पनेपलीकडचा वाटतो. बाकी विक्रम हा चित्रपट उत्तमच म्हणावा लागेल. चित्रपटाला चार स्टार देण्यात आले आहेत. मित्रानो, चित्रपटाचे विश्लेषण आपणास कसे वाटले हे आपल्या प्रतिक्रयाद्वारे नक्की कळवा. कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रया आपणास नोंदवता येईल. पून्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह..! प्रिय वाचकांनो, आपल्या 'एचके ब्लॉग' वर विविध विषयांवरील साहित्याचा खजिना उपलब्ध आहे. स्वतः आनंद घ्या आणि आपल्या मित्र-परिवारालाही ब्लॉग शेअर करून लाभ होऊ द्या. वाचनाने व्यक्ती समृद्ध आणि विचारांनी संपन्न होतो..! धन्यवाद..!
लेखक चित्रपट समीक्षक आहेत.
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
खूप छान लेख लिहिला आहे आपण आमची देखील चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढवली आहे धन्यवाद
उत्तर द्याहटवाI am grateful for your support.
हटवालेख वाचून चित्रपट नक्की पहावा असे वाटत आहे. छान विस्लेशन.
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻😊
हटवाKhup Chhan, 👌👌 KGF nantr aata Loki universe Pahayla Milnar
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻😊
हटवा