‘ब्लू चीप’ शेअर्स म्हणजे काय?

एचके लर्निंग अँड एनएए : 
शेअर बाजारात काम करत असताना आवश्‍यक माहिती असणे गरजेचे आहे. या क्षेत्रातील बऱ्याच शब्दांचा अर्थ माहित नसल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेण्यास अडचण येते. ब्लू चीप हा शब्द शेअर बाजारातील जानकारांकडून नेहमीच बोलला जातो. या शब्दाचा नेमका अर्थ काय? हेच आपण या लेखात जाणून घेणार आहोत. ट्रेडर्स आणि गुंतवणुकदारांना ब्लू चीप शेअर्सबद्दल खुपच आकर्षण असते. 'ब्लू चीप' कंपन्यांमध्येच गुंतवणूक असायला हवी, असे जानकारांकडून नेहमीच सल्ले दिले जातात. हे 'ब्लू चीप' शेअर्स म्हणजे नक्की काय? यामधील गुंतवणुकीत खरेच जोखीम नाही का? यावर आपण सविस्तर माहिती करून घेऊया, म्हणजे आर्थिक निर्णय घेणे सोयीचे होईल. 

इतिहास 'ब्लू चिप'चा 
'ब्लू चीप' हा शब्द नेमका आला कोठून, याचा इतिहास काय? आधी हे जाणून घेऊया. १९ व्या शतकात अमेरिकेत पोकर हा खेळ प्रतिष्ठेचा होता. या खेळात पांढऱ्या, लाल आणि निळ्या रंगाच्या चीप्स म्हणजे चकत्या वापरल्या जायच्या. या चीप्सचे मूल्य अनुक्रमे १ डाॅलर, ५ डाॅलर आणि २५ डाॅलर होते. निळ्या रंगाच्या चीप्सचे मूल्य सर्वाधिक होते. त्यानंतर १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात उच्च मूल्यासाठी 'ब्लू चीप' शब्द वापरला जायचा. यावरून पुढे उच्च मूल्यांकन असलेल्या मालमत्तेसाठीसुद्धा 'ब्लू चीप' हा शब्द वापरला जाऊ लागला. अमेरिकन शेअर बाजारात १९२० च्या सुमारास उच्च भावातील शेअर्स किंवा उत्तम प्रतीचे शेअर्स यासाठी 'ब्लू चीप' हा शब्द प्रचलित झाला. 

कालांतराने शेअर बाजारातील ज्या कंपन्या सर्वाधिक भरवशाच्या अशा कंपन्यांसाठी 'ब्लू चीप' शब्द वापरला जाऊ लागला. 'ब्लू चीप' कंपन्या बाजार भागभांडवलात मिड कॅप किंवा बहुतांशी लार्ज कॅप कंपन्या असतात. या कंपन्या आपल्या उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्या असतात. त्याचबरोबर या कंपन्यांमध्ये नियमीत नफा कमावण्याची क्षमता असते. गुंतवणूकदारांना लाभांशही खात्रीशीर मिळतो. त्यामुळे अशा कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकदारांची पहिली पसंती असते. या शेअर्समध्ये मोठे चढ-उतार होत असल्यामुळे ट्रेडर्सचीही या शेअर्सना पसंती असते. निफ्टी टॉप टेन, निफ्टी 50, सेन्सेक्स, बँक निफ्टी या इंडेक्स मध्ये समावेश असलेल्या कंपन्या ब्लू चीप कंपन्यांमध्ये मोडतात. 

का घ्यावेत ब्लू चीप शेअर्स?
कंपनीचे बाजार भागभांडवल खूप मोठे असल्यामुळे या कंपन्या लार्ज कॅप म्हणून ओळखल्या जातात. खात्रीशीर आणि नियमित लाभांश दिला जातो. त्या-त्या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असते. कंपनीची बाजारात चांगली पत असते. 'ब्लू चीप' शेअर्समधील गुंतवणूक अन्य शेअर्सपेक्षा अधिक चांगली आणि सुरक्षीत मानली जाते. शेअर बाजारातील दिग्गज  गुंतवणूकदार, म्युच्युअल फंड कंपन्या आणि परकीय गुंतवणूक संस्था गुंतवणुकीसाठी अशाच कंपन्यांची निवड करतात. गुंतवणूकदारांना नेहमी 'ब्लू चीप' कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. ब्लू चीप शेअर्समध्ये तरलता जास्त आणि अस्थिरता कमी असते. म्हणून 'ब्लू चिप' कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करणे सुरक्षित असते. 

(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI


टिप्पण्या

  1. शेअर बाजार सर्वांचेच आकर्षण झाले आहे... ब्लॉगवर शेअर बाजार संदर्भातील लेख पारदर्शक आणि ज्ञान वाढविणारे तर आहेच शिवाय या लेखांद्वारे मला या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. शिस्त पाळत मी उत्तमप्रकारे नफाही कमावत आहे. ब्लॉगचे आणि लेखकांचे मनस्वी आभार...! - पराग पटेल, मुंबई

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली