कार्तिकेय-2

एचके लर्निंग अँड एनएए :
परमेश्वर भूतलावर मानव अवतारात जनकल्याण करतात आणि  हे करताना जे जे घडते ते पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आणि आदर्श ठरते. भविष्यात याच दंतकथा म्हणून ओळखल्या जातात. ज्याचे समरण संस्कार आणि पौराणिक कथा म्हणून होते. आजही अनेक पौराणिक कथा मानवासाठी आदर्शवत आणि मार्गदर्शक ठरत आहेत.  याच धर्तीवर 'कार्तिकेय 2' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या  जीवनावर आधारित हा चित्रपट भाविकांच्या भेटीस आला आहे. चला तर मग चित्रपटाविषयी जाणून घेऊ या..! 

चित्रपटाची सुरुवात होते ती द्वापारयुग आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या जीवनापासून..! पुढे चित्रपट वर्तमानात येऊन पोहोचतो. एक प्राध्यापक ग्रीस देशामध्ये एका वाचनालयात भगवान  श्रीकृष्ण यांच्या संदर्भात लेख वाचततात. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात अडचणींचा प्रवास सुरू होतो. ज्या गुप्त संस्थेमध्ये प्राध्यापक रंगनाथ राव काम करतात त्याच संस्थेचे काही लोक त्यांचा पाठलाग करून त्यांना जीवे मारणार असतात. अशी कोणती माहिती त्यांच्या हाती असते, की ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात असतो? हे चित्रपटाचे सस्पेन्स वाढवत जाते. अशातच कार्तिक जो एक डॉक्टर आहे आणि विज्ञानावर त्याचा पूर्ण विश्वास आहे.  तंत्र-मंत्र तसेच जे डोळ्यांना दिसत नाही यावर त्याचा  विश्वास नाही. नवयुगातील कार्तिकला जीवन काय आणि का आहे? हा प्रश्न सतावत असतो. अशातच आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आईसोबत द्वारका येथे श्रीकृष्ण मंदिरात दर्शनासाठी येतो आणि तेथून त्याच्या आयुष्यला वेगळेच वळण येते. एक दिवस भक्त निवासच्या बाहेर बसलेल्या कार्तिकजवळ प्राध्यापक राव जखमी अवस्थेत येऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. हा सर्व प्रकार एका कॅमेऱ्यात कैद होतो. 

यातच पोलिस कार्तिकला अटक करतात. राव यांची नात मुग्धा ही कार्तिकला सोडवते व सत्य त्याच्यासमोर आणते. प्राध्यापक राव भगवान श्रीकृष्णाच्या पायातील सोन्याच्या कड्याचा शोध घेत असतात. ज्यावर भविष्यात येणाऱ्या महामारीचा उपाय लिहलेला असतो. ते शोधाच्या अगदी जवळ असतात, की त्यांचा खून होतो. मात्र मुग्धा हा शोध पुढे चालूच ठेवते. पोलिस कार्तिकला शोधत असतात आणि  'अभीर' देखील कार्तिकला जीवे मारण्यासाठी निघालेला असतो.    

या सर्व संकटावर मात करून कार्तिक हे रहस्य सोडवू शकणार काय? जगावर कोणत्या महामारीचे संकट येणार असते? कोण आस्तिक, कोण नास्तिक? या सर्व प्रश्नांची उत्तरे कार्तिकेय 2 या चित्रपटात मिळते. अनुपम खेर (डॉ. धन्वंतरी वेदपाठक) यांचा मोनोलॉग अगदी लक्षपूर्वक ऐकण्यासारखा आहे. यामध्ये भगवान श्रीकृष्णाबद्दल त्यांनी जो बारकाईने अभ्यास केला आहे तो प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतो. यामधून ते स्पष्ट सांगतात की भगवान श्रीकृष्णाला ज्या दृष्टीने पाहणार तसे ते  दिसतील. अर्थात आपल्या अंतरंगात जे आहे तेच बाहेर प्रकट होईल. देव आहे की नाही ही संकल्पना बाजूला ठेवून आपण आपल्यात देवपण आणू  शकतो का? हा प्रश्न चित्रपट पाहताना स्वतःला आपोआपच विचाराला जातो. दिग्दर्शक चांदू मोडीती यांनी "धर्म" हा विषय अगदी सहजतेने हाताळला आहे आणि यातून प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडले आहे. तसेच इतर कलाकारांचा अभिनय देखील उत्तम. मात्र काही ठिकाणी चित्रपट रेंगाळतो. बाकी चित्रपट एक नावीन्य ऊर्जा प्रदान करणाराच आहे. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे  चित्रपटाचे बजेट हे फक्त १५ करोड आहे. यात ॲनिमेशन (Animation) (CGI)अर्थात कॉम्प्युटर ग्राफिक्स इफेक्ट व VFX यांचा वापर अगदी योग्य रीतीने केला आहे. सुरुवातीला ५० स्क्रीनवर प्रदर्शित होऊन या चित्रपटाने आतापर्यंत ५० करोडपेक्षा जास्त कमाई केली आहे. अशा प्रकारचे दमदार कथानक घेऊन चित्रपट प्रदर्शित झाल्यास प्रेक्षक नक्कीच अशा चित्रपटांचे स्वागत करतील. हेच या चित्रपटाच्या यशावरून सिद्ध होते. या चित्रपटाला ३ स्टार देण्यात आले आहेत. 

प्रिय वाचकांनो, चित्रपटाचे विश्लेषण आपणास कसे वाटले हे आपल्या प्रतिक्रयाद्वारे नक्की कळवा. कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रया आपणास नोंदवता येईल. पून्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह..!  आपल्या 'एचके ब्लॉग' वर विविध विषयांवरील साहित्याचा खजिना उपलब्ध आहे. स्वतः  आनंद घ्या आणि आपल्या मित्र-परिवारालाही ब्लॉग शेअर करून लाभ होऊ द्या. वाचनाने व्यक्ती समृद्ध आणि विचारांनी संपन्न होतो..! धन्यवाद..!

मेघनिल उगले
लेखक चित्रपट समीक्षक आहेत. 
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI

टिप्पण्या

  1. Great job meghnil, I never watch movies without reading you’re article.

    उत्तर द्याहटवा
  2. छान विश्लेषण आहे. चित्रपट नक्कीच पाहणार.. धन्यवाद मेघनीलजी आपले विश्लेषण वाचून चित्रपट पाहण्याचा आनंद वेगळाच असतो. रश्मी कडेपुरकर, कोल्हापूर

    उत्तर द्याहटवा
  3. खुप छान ,चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढवणारा व चित्रपट का बघावा याची सुरेख समीक्षा केली आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

गुळवेलचे आरोग्यदायी फायदे

विचारांना समजून घेताना

रोगनिवारक अश्‍वगंधा अन्‌ शतावरी

लोक काय म्हणतील..?

मधुमेही अन्‌ उपवास

माझे आरोग्य माझी जबाबदारी...!