आर्थिक साक्षरतेतून धनप्राप्ती..!
ज्ञानप्राप्तीसाठी साक्षरता महत्वाची; मात्र नुसतंच साक्षर होऊन चालणार नाही, तर आर्थिक साक्षरताही तितकीच गरजेची आहे. साक्षर झाल्यावर सरस्वती प्रसन्न होऊन विद्वत्ता प्राप्त होते, तर आर्थिक साक्षर झाल्यास लक्ष्मी प्रसन्न होऊन धनसंपत्ती प्राप्त होते. आपण या लेखात आर्थिक साक्षर कसे होता येईल यावर चर्चा करणार आहोत. आर्थिक गरजा भागवण्यासाठी कुणी व्यवसाय तर कुणी नौकरी करतात. हे करत असताना लक्ष पैसे कमविणे हाच..! नंतर पैसे साचविणे आणि भरपूर साचविणे हे एकमेव ध्येय बनते. या ध्येयातून आनंदप्राप्ती मिळवली जाते. मात्र या आनंद प्राप्तीसाठी वेळही काढावा लागतो, जो काढणे वाटते तितके सोपेही नसते. कारण नोकरी व्यवसायात इतके व्यस्त असतो, की एन्जॉय करणंच राहून जातं. याचसाठी आर्थिक साक्षरता महत्वाची आहे. शारीरिक कष्ट करून जो पैसा कमविलेला असतो त्याच पैश्यातून पैसा कमविणे तेही शारीरिक कष्ट न करता, यालाच आर्थिक साक्षरता म्हणतात. विविध माध्यमातून गुंतवणूक करून पैशांपासून पैसा वाढवता येतो. यासाठी विविध गुंतवणुकीचे माध्यम आणि कालावधी निवडता येतो.
गुंतवणुकीचे विविध माध्यम आणि परतावा : बँकेतील बचत, मुदत ठेव, पोस्टातील आरडी, बॉण्ड तसेच विविध शासकीय योजना यातून मिळणारा परतावा निश्चित असतो. साधारणतः ४ ते ८ टक्यांपर्यंत गुंतवणुकीवर वार्षिक परतावा मिळू शकतो. आपली गरज ओळखून गुंतवणुकीचा कालावधी ठरवायला हवा. अतिरिक्त रक्कम असल्यास ती मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवायला हवी. या माध्यमातून साधारणतः ६ ते ७ वर्षात गुतवलेली रक्कम दुप्पट मिळत असते. मात्र गुंतवणूक सुरक्षित ठिकाणीच गुंतवायला हवी. यासाठी सरकारी बँका, पोस्ट ऑफिस किंवा नामवंत खासगी वित्तीय संस्था अशी निवड असायला हवी. अधिक व्याजदर देणाऱ्या आणि फारसा चांगला इतिहास नसरणाऱ्या वित्तीय संस्थांपासून लांबच राहावे.
गोल्ड, जमीन या माध्यमातील गुंतवणूक : हे माध्यम दीर्घ कालावधीचे असून अधिक उत्पन्न देणारे मानले जाते. मात्र यासाठी गुंतवणूक मोठी असावी लागते. जमिनीचा योग्य भाव मिळाल्यास ती खरेदी केली जाते. तो परिसर विकसीत झाल्यावर तीन ते चार पटीने ती जमीन विकून नफा कमविला जातो. मात्र यात १० ते २० वर्षही लागू शकतात. सोने म्हणजेच गोल्ड हे माध्यम सर्वांसाठी सोयीचे आहे. प्रत्येक महिन्यात किंवा वर्षी आपल्या सोयीनुसार सोने खरेदी करता येते. या गुंतवणुकीचा दुसरा फायदा असा, कि यावर बँक १ टक्के व्याजदराने कर्जही देतात जे आपल्या व्यवसाय वाढीसाठीही वापरता येते. तसेच जमिनीतूनही भाडे स्वरूपात उत्पन्न मिळवता येते. हे असे माध्यम आहे, कि यातून विकल्यास नफा आणि वापर केल्यास उत्पन्न मिळू शकते.
म्युच्युअल फंड आणि परतावा : म्युच्युअल फंडचा परतावा हा शेअर बाजारावर अवलंबून असतो. यातून १० ते १५ टक्के परतावा मिळू शकतो मात्र गुंतवणूक दीर्घ मुदतीसाठी असावी. यासाठी गुंतवणूक करताना वेळ योग्य हवी. जर एखाद्या फंडाची युनिट किंमत खूपच जास्त असेल तर तो फंड अपेक्षेप्रमाणे परतावा देणार नाही. उलट युनिटची किंमत घसरत राहिली तर परतावा उणे होऊ शकतो. म्हणून फंडाची युनिट किंमत तपासूनच फंड निवडणे योग्य होईल. टाईमिंग योग्य असला तर अपेक्षेपेक्षाही परतावा अधिक मिळू शकतो. म्हणून आपल्या आर्थिक सल्लागारकडून योग्य माहिती मिळवून या माध्यमात गुंतवणूक करणे आर्थिक हिताचे ठरेल. यातही ओपन इंडेड आणि क्लोज इंडेड असे दोन प्रकार असतात. यातून ओपन इंडेड हा पर्याय निवडावा म्हणजे जेव्हा शेअर बाजार खूप वाढलेला असेल तेव्हा एसआयपी थांबवता येते आणि शेअर बाजार खूप कोसळलेला असल्यास एसआयपी पुन्हा चालू करता येते. मात्र क्लोज इंडेड पर्याय निवडल्यास एसआयपी थांबवता येत नाही आणि अधिक किमतीने युनिट खरेदी होते, ज्याचा परिणाम भविष्यात परताव्यावर होतो.
शेअर्स आणि यातून मिळणारे फायदे : आर्थिक साक्षर होण्यासाठी शेअर बाजार समजून घेणे अति आवश्यक आहे. कारण हेच एक माध्यम असे आहे, कि फिरून फारून विविध माध्यमातील गुंतवणूक विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवली जाते आणि त्यातून आलेला परतावा त्यात्या माध्यमातून दिला जातो. म्युच्युअल फंड कंपन्या जमा झालेला फंड विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवून मोठा नफा कमवतात आणि तोच नफा त्यांचे कमिशन, खर्च वजा करून त्यांच्या गुंतवणूकदारांना दिला जातो. म्हणजे गुंतवणूकदाराच्या वतीने या म्युच्युअल फंड कंपन्या शेअर बाजारात काम करतात. मात्र आपण स्वतः आर्थिक साक्षर झाल्यास शेअर्समधून मिळणारे सर्वच्या सर्व फायदे आपल्यालाच मिळतील याचा विचार होणेही गरजेचे आहे.
शेअर्सपासून मिळतो डिव्हीडंडचा लाभ : आपल्याकडे जर एखाद्या चांगल्या कंपनीचे १००० शेअर्स असले तर त्या प्रत्येक एका शेअर्सवर प्रत्येक तीन महिन्यांनंतर डिव्हीडंड दिला जातो. जो कंपनीमार्फत सरळ आपल्या बँक खात्यात जमा होतो. साधारणतः 1 पासून तर 70 रुपयांपर्यंतही डिव्हीडंड दिला जातो. ५ रुपये डिव्हीडंड जरी म्हटले तरी ५ हजार, एका वर्षात ४ वेळा म्हणजे २० हजार नुसता डिव्हीडंड मिळतो. तेच २० हजार पुन्हा इतर शेअर्समध्ये गुतवल्यास संपत्ती वाढत जाते. यासाठी शेअर बाजाराची माहिती पुरवणाऱ्या माध्यमांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
शेअर्सपासून मिळतो बोनसचाही लाभ : ज्याप्रमाणे शेअर्स पासून डिव्हीडंडचा लाभ मिळतो तसेच बोनसही मिळते. म्हणजे कंपनी एका शेअरवर अतिरिक्त शेअर देते तेव्हा त्याला बोनस म्हणतात. समजा आपल्याकडे एखाद्या कंपनीचे १०० शेअर्स आहेत. कंपनीने १:१ म्हणजे एकावर एक शेअर बोनस दिला, तर आपल्या डिमॅट खात्यात २०० शेअर्स जमा होतात. आणि पुढील प्रत्येक तीन महिन्यानंतर १०० ऐवजी २०० शेअर्सवर डिव्हीडंडचा लाभ मिळतो.
शेअर्सपासून मिळतो स्प्लिटचा लाभ : जेव्हा कंपनी शेर्सचे विभाजन करते तेव्हा अशा प्रक्रियेला शेअर्स स्प्लिट होणे असे म्हणतात. हि प्रक्रिया १० वर्षात दोन वेळेसही होऊ शकते. समजा एखाद्या कंपनीचा शेअर १००० रुपयाला आहे. कंपनीने स्प्लिटची प्रक्रिया सुरु करून एका शेअरचे दहा शेअर्स असे विभाजन केल्यास गुतवणूकदाराजवळील शेअर्सची संख्या वाढते आणि डिव्हीडंडचा लाभही अधिक मिळतो. समजा एखाद्याकडे १०० शेअर्स असतील तर त्याचे १००० शेअर्स होतील. मात्र स्प्लिट होताना त्याची गुंतवणुक तेवढीच असते फक्त शेअर्सची संख्या वाढते. स्प्लिटनंतर शेअर १०० रुपये झाल्यावर त्यात गुंतणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात आणि पुन्हा शेअर्सची किंमत वाढायला लागते आणि गुतवणूकदाराच्या रकमेतही वाढ होत जाते.
काय मग बनतायना आर्थिक साक्षर..! शेअर बाजाराविषयी आपल्या ब्लॉगवर https://hklearning-naa.blogspot.com भरपूर माहिती उपलब्ध आहे. जी वाचून आपण नक्कीच आर्थिक साक्षर बनाल. शिवाय "एचके लर्निंग अँड एनएए" आहेच कि आपल्या सोबत. यात नोंदणी करून प्रत्यक्षात शेअर बाजारात काम करण्याचा अनुभव तुमच्याच डिमॅट खात्यात घेता येईल. मग आताच आपल्या ब्लॉगवर जा आणि नोंदणी करून शुभारंभ करा. चला तर मग येथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह आपल्या आर्थिक साक्षरतेसाठी...!
- कैलास एन. हिरोडकर संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक निसर्ग अभ्यासक आणि शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Khup chan mahiti dilit👌🏻
उत्तर द्याहटवालेख मार्गदर्शक... धन्यवाद परिपूर्ण माहितीबद्दल...
उत्तर द्याहटवासर, आपले सर्वच लेख खूप वाचनीय आणि अभ्यासपूर्ण आहेत. आजचा लेख खरचं आर्थिक साक्षरता म्हणून उत्तम आहे. म्युचुअल फंड बद्दल दोन प्रकार असतात नव्हते माहीत... म्हणून खरचं माझी वेळ चुकली होती हे आपल्या लेखातून समजले... मी नक्कीच एचके लर्निग जॉईन करत आहे.
उत्तर द्याहटवाGood article. Very well written 👌🏼👌🏼
उत्तर द्याहटवा