चूप : कलाकाराचा बदला

एचके लर्निंग अँड एनएए :
कलाकार आणि त्याने घडवलेली कलाकृती ही त्या  कलाकारासाठी अगदी जीव की प्राण असते. याचे कारण असे की, जसे आई आपल्या बाळाचा संभाळ करते तशीच मानसिकता कलाकाराचीही असते. कारण त्याच्या अंतरंगातून नवनवीन निर्मितीचा जन्म होतो. विविध नवनवीन विषय घेऊन चित्रपटांची निर्मिती होते. त्या निर्मितीसाठी अहोरात्र कष्ट घेतले जातात. मात्र काही कारस्थानांमुळे परिणाम अपेक्षा भंग करतात, कलाकृतीला योग्य न्याय दिला जात नाही. अशा परिस्थितीत कलाकाराची मनस्थिती बिघडते. जबाबदार यंत्रणा आणि व्यक्तींविषयी मनात राग आणि तिरस्कार निर्माण होतो. याचे रूपांतर कशात होऊ शकते याची कल्पनाच न केलेली बरी..! असाच आणि अगदी आजवर फारसा प्रकाशात न आलेला विषय या 'चूप' चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर आला आहे. जो चित्रपट निर्मिती क्षेत्रातील वास्तव्य दर्शवतो. 

मर्यादा व अपेक्षा यांच्या सर्व सीमा पार करून कलाकार काय करू शकतो हे या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. कथा सुरू होते ती मुंबई या शहरातून..  आज "बॉलिवूड" चा दबदबा जेथे आहे आणि प्रत्येक शुक्रवारी लोक तिकीट काढून नवीन चित्रपटाचा आस्वाद घेत असतात तिथेच खुनाचे सत्र सुरू होते. खुनाचे कारण असे की, प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे समीक्षण योग्य रीतीने न केल्याने समीक्षकाचा खून अत्यंत विचित्र पद्धतीने  होतो. हा विचित्र गुंता सोडवण्यासाठी इनस्पेक्टर अरविंद माथुर (सनी देओल) ही केस हातात घेतात. 

निला मेननची  (श्रेया धन्वंतरी) एक पत्रकार तिची बदली मुंबई येथील ऑफिसमध्ये होते. फुलांची आवड असलेल्या निलाची ओळख डॅनी (दुलकर सलमान) नावाच्या एका फुल विकणाऱ्या व्यक्ती सोबत होते. त्याच वेळी अजून एका चित्रपट समीक्षकाचा खून होतो आणि संपूर्ण शहाराला धक्का बसतो. याचे कारण असे की, प्रत्येक वेळी खुनी हा खून झालेल्या व्यक्तीच्या डोक्यावर जितके स्टार त्या चित्रपटासाठी दिले गेले असतील तितके स्टार काढतो.  

डॅनी व निलाची ओळख वाढत जाते. तिचे चित्रपटांवर असलेले प्रेम डॅनीला समजते. तसेच डॅनी फक्त एक फूलवाला नसून एक चांगला कलाकारही असतो हे तिच्या दृष्टीस पडते. दोघांची मैत्री वाढत जाते. इकडे खून सत्रामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढत जाते. हा गुंता आणि गुन्हेगाराची मानसिकता समूजन घेण्यासाठी प्रवीण झिनोबिया (पूजा भट्ट) यांना  बोलवण्यात येते. यामुळे पोलिसांना वेगाने शोध घेण्यास मदत मिळते. कारण अशा अनेक गोष्टींचा उलगडा यातून होतो की ज्या कल्पनेपलीकडच्या असतात. हे सर्व खून का? व कोणी केलेत? याचे कारण जेव्हा समजते तेव्हा आपली अवस्था  "चूप" होते. 

येथे प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत संलग्न आहे. हा कलाकारांचा चित्रपट नसून कथा, दिग्दर्शक व कॅमेरा यांचा चित्रपट आहे. दिग्दर्शक व लेखक रा. बल्की यांनी प्रयोगात्मक चित्रपट कसा असावा याचे उदाहरण यातून स्पष्ट केले आहे. "चूप" हा असा एक चित्रपट आहे जो आपल्या मनातील भावनांना स्पष्टपणे समोर आणून ठेवतो. यातून आपण काय निवडायचे किंवा सोडायचे हे आपणच ठरवायला हवे.

चित्रपटाचे संगीत हे भारतीय चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक, लेखक गुरूदत्त यांच्या "कागज के फूल" यातून घेतलेले असून यातील गाणी ही आपणास 60 व्या दशकात घेऊन जातात. तसेच संगीताची मांडणी व ठेवण अशा प्रकारची आहे ज्यामुळे चित्रपट बघताना उत्कंठा वाढते.  "चूप" हा चित्रपट नक्कीच एक वेगळा प्रयोग आणि नवीन दृष्टीकोन देणार  आहे. चित्रपटाला 4 रेटिंग स्टार देण्यात आलेले आहे. 

प्रिय वाचकांनो, चित्रपटाचे विश्लेषण आपणास कसे वाटले हे आपल्या प्रतिक्रयाद्वारे नक्की कळवा. कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रया आपणास नोंदवता येईल. पून्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह..!  आपल्या 'एचके ब्लॉग' वर विविध विषयांवरील साहित्याचा खजिना उपलब्ध आहे. स्वतः  आनंद घ्या आणि आपल्या मित्र-परिवारालाही ब्लॉग शेअर करून लाभ होऊ द्या. वाचनाने व्यक्ती समृद्ध आणि विचारांनी संपन्न होतो..! धन्यवाद..!

मेघनिल उगले
लेखक चित्रपट समीक्षक आहेत. 
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI


टिप्पण्या

  1. चित्रपट बघताना खुन कुणी केला असाव हे बघण्याची जशी उत्सुकता वाढते त्या प्रमाणे चित्रपट का बघावा यासाठी आपण खुप सुदर चिपट समीक्षा लिहिली आहे

    उत्तर द्याहटवा
  2. I have watched 1st day 1show and loved the movie , concept ,plot also each character is potrayed well on screen specially dulqer has shown variety of characted throughout the year and seeing him in pshychotic character was very new experiance and movie was successful to hold the audiance till last, great story and your blog always helps to understand movies better so keep reviewing keep posting for us .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली