कांतारा
मानव जन्म हे एक गूढ रहस्य तर आहेच..! परंतु 'देव' म्हणजे नक्की काय? आपल्या आयुष्यात देव एक संकल्पना की सत्याची प्रचिती? आपण नक्की कोण आहोत..? याचा शोध हजारो वर्षांपासून होतोय. यातून मिळणारे परिणाम म्हणजे देव स्वतःमध्येच आहे, ही संकल्पना मान्य केली गेली आहे. भारतात अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की त्यावरून देव ही संकल्पना मान्यच करावी लागते. हाच विषय घेऊन ‘कांतारा’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आजवर निरूत्तर प्रश्नांची उकलही या चित्रपटातून होते.
सन 1800 मधील, जगातील सर्व सुख सोयी उपलब्ध असलेल्या भारतातील एका राजाची ही कथा..! प्रजेसाठी राजा आदरणीय..! राजा सर्वसंपन्न जरी असला तरी आयुष्यात शांतता नसल्याने राजा अस्वस्थ आहे. शांतता प्राप्तीसाठी राजा साधू, संत, योगींकडे धाव घेतो. सर्व शोधांती राजाला जाणीव होते, की आत्मीक शांततेसाठी स्वत:लाच प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणून राजा शांतताप्राप्तीच्या शोधात जंगलात निघताे. तेथे राजाला देवाचे दर्शन एका दगडाच्या रूपात होते जो आदिवासी लोकांचे दैवत असतो. तेथील आदीवासींना राजा विनंती करतो, की तुमचा देव मला द्या आणि त्याबदल्यात तुम्हाला जे हवे ते माझ्याकडून घ्या. याचवेळी अद्भूत घटना घडते दगडातील देव मानवरुपात प्रकट होतो आणि राजाला शांती प्रदान करतो. मात्र त्यासाठी राजाला अट मान्य करावी लागते. ती म्हणजे राजाने वचन मोडल्यास राजाच्या वंशाचा विनाश होईल.
राजा ही अट मान्य करून देवाला आपल्या सोबत घेऊन जातो. त्यादिवसांपासून राजाला सुख-समृध्दीसह आनंद, शांतता प्राप्त होते. आणि तेथून सुरू होतो या देवाचा उत्सव ज्याला ‘कोला’ या नावाने संबोधले जाते आणि हा उत्सव वर्षातून एकदा होत असतो. या उत्सवात देवाचे पारंपरिक पद्धतीने पूजन होते.
काळ पुढे सरकतो, प्रत्येक वर्षी ‘कोला’ उत्सवात ‘दैव’ अर्थात देव हे मानवरूपात येऊन लोकांना आशीर्वाद देतात. याच दरम्यान भारत 1947 ला स्वतंत्र होतो. सरकार आता सर्व आदिवासी व त्यांच्या जमिन यांना संरक्षित वनक्षेत्र यात सामावून घेणार असतात. शिवा (रिषभ शेट्टी) याच आदिवासी गावात मोठा झालेला असतो. शिवाचे वडील ‘कोला’ उत्सवात ‘दैव’ बनलेले असतांना अचानकपणे जंगलात नाहिसे होतात. असे का झाले याचे उत्तर शिवा शोधत असतो. दुसरीकडे संपूर्ण गावाला जंगलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. याला शिवाचा विरोध असतो. राजाचे वंशज देवेंद्र हे सर्व जमिन विकण्यासाठी तयार झालेले असतात. यासाठी ते ‘कोला’ उत्सव ‘दैव’ होणाऱ्या गुरूवाला सांगतात की, जर तू जमिन विकण्यास मदत केली तर बदल्यात तुला काही जमिन बक्षिस म्हणून मिळेल. फॉरेस्ट ऑफिसर ‘मुरलिधर’ शिवाला जीवे मारण्याच्या आरोपवरून अटक करतो. याचदरम्यान गुरूवाचाही मृत्यू होतो.
आता ‘कोला’ प्रथा पुढे कोण चालवणार? राजाचे वंशज जमिन विकून ‘दैव’चा शाप भोगणार काय? देव मानवरुपात येऊन लोकांना आशीर्वाद देतो का? ही एक श्रद्धा की अंधश्रद्धा? फॉरेस्ट ऑफिसर मुरलीधरण यांचा या प्रथेवर विश्वास आहे की नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘कांतारा’ चित्रपट पाहिल्यावर मिळेलच. भारतातील छोट्या खेड्यांवरील देव किंवा ईश्वराची संकल्पना कशी आहे? हे दाखवणारा हा एक उत्तम सांस्कृतिक चित्रपट आहे. या चित्रपटाचे अभिनेता, लेखक व दिग्दर्शक रिषभ शेट्टी यांनी बारकाईने अभ्यास करून चित्रपटाची निर्मिती केलेली दिसते. चित्रपटातील संगीताची ठेवणही पूर्णपणे पारंपारिक वाद्यावर अवलंबून असून भारतीय संगीताची जादूही या चित्रपटात अनुभवयाला मिळते.
प्रिय वाचकांनो, चित्रपटाचे विश्लेषण आपणास कसे वाटले हे आपल्या प्रतिक्रयाद्वारे नक्की कळवा. कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रया आपणास नोंदवता येईल. पून्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह..! आपल्या 'एचके ब्लॉग' वर विविध विषयांवरील साहित्याचा खजिना उपलब्ध आहे. स्वतः आनंद घ्या आणि आपल्या मित्र-परिवारालाही ब्लॉग शेअर करून लाभ होऊ द्या. वाचनाने व्यक्ती समृद्ध आणि विचारांनी संपन्न होतो..! धन्यवाद..!
लेखक चित्रपट समीक्षक आहेत.
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
Good one Meghnil 👌👍
उत्तर द्याहटवाThank you 😊🙏🏻
हटवाVery nice
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻😊
हटवा