स्टॉक मार्केट : अप्पर-लोअर सर्किट
स्टॉक्स आणि इंडेक्ससाठी सर्किट फिल्टर्स मार्केट रेग्युलेटर SEBI द्वारे सेट केले जातात. हे सर्किट फिल्टर स्टॉकची बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन किंवा स्टॉकमधील कोणत्याही असामान्य क्रियाकलापांना प्रतिबंध करण्यासाठी सेट केले जातात. बाजारातील हालचालींवर आधारित स्टॉक फिल्टरमध्ये वेळोवेळी सुधारणाही केली जाते. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणुकदारांचे कुठल्याही असामान्य घडामोडींमुळे नुकसान होऊ नये असा आहे. स्टॉक मार्केटमध्ये नियमबाह्य आणि चुकीचे घडू नये, ज्यामुळे गुंतवणुकदारांचे नुकसान होईल यासाठी सेबीद्वारे संपुर्ण स्टॉक मार्केट नियंत्रित करण्यात येते. यासाठी काही मॅकॅनिझम लावण्यात आलेले आहे. ज्या व्यवहारांमध्ये संशयास्पद हालचाली होतात तेथे स्वयंचलित यंत्रणा आपोआपच कार्यरत होते. त्यातीलच एक यंत्रणा म्हणजे अप्पर-लोअर ब्रेकर सर्किट.
स्टॉक मार्केटमधील अप्पर सर्किट आणि लोअर सर्किटचा इतिहास २८ जून २००१ पासून सुरू झाला. त्याच दिवशी बाजार नियामक सेबीने सर्किट ब्रेकरची व्यवस्था सुरु केली. ही प्रणाली १७ मे २००४ रोजी पहिल्यांदा वापरली गेली. आजवरच्या इतिहासात स्टॉक मार्केट अनेकदा घसरला आणि वाढला देखील आहे. स्टॉक मार्केटमधील घसरणीप्रसंगी ट्रेडर्स, इन्व्हेस्टर यांना लोअर सर्किट लागण्याची भीती असते. अशा अवस्थेत इन्व्हेस्टरांपेक्षा ट्रेडर्स यांची चिंता अधिक असते. कारण त्यांच्या ट्रेडच्या विरुद्ध दिशेने स्टॉक जात असेल तर मोठे नुकसान होऊ शकते. स्टॉक मार्केटमध्ये लोअर सर्किटचा फायदा इन्व्हेस्टर यांना घेता येतो. मात्र अशी परिस्थिती केव्हा आणि कशी निर्माण होते हे पाहूया. मार्केटमध्ये अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट म्हणजे नेमके काय आणि ते का लागते, यावरही सविस्तर चर्चा करूया.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांबद्दल बोलायचे झाले तर त्यांना कधीकधी खूप आश्चर्य वाटते की शेअर्सची किंमत कशी वाढते आणि कशी कमी होते. तर याचे उत्तर सोपे आहे. पुरवठा आणि मागणीमुळे शेअर्सच्या मूल्यात चढ-उतार होतो. जर एखाद्या कंपनीच्या शेअर्सची मागणी अधिक असेल आणि पुरवठा कमी असेल तर आपोआपच त्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ होईल. याउलट एखाद्या कंपनीच्या शेअर्सचा मार्केटमध्ये पुरवठा अधिक असेल आणि मागणी कमी असेल तर त्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत घसरण होईल. थोडक्यात सांगायचे झाल्यास जेव्हा जेव्हा शेअरची मागणी वाढते तेव्हा त्याची किंमत वाढते आणि जेव्हा शेअर्सवर विक्रीचा जोर वाढतो म्हणजेच पुरवठा वाढतो तेव्हा शेअरची किंमत कमी होऊ लागते. या किमतींच्या चढ-उतारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच अप्पर-लोअर सक्रिट ब्रेकर या स्वयंचलित यंत्रणेचा वापर केला जातो.
अप्पर सर्किट म्हणजे काय? : जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअर्सला अचानक मोठी मागणी येते तेव्हा त्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी वाढ होते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अप्पर सर्किट लावले जाते. पहिले सर्किट शेअर्सची किंमत 10%, दुसरे सर्किट 15% तर तिसरे सर्किट 20% वाढल्यावर लावण्यात येते. प्रत्येक सर्किट लागल्यावर दिवसभरात विशिष्ट वेळेसाठी त्या कंपनीच्या शेअर्समधील खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबवले जातात. तिसऱ्या टप्प्यात पुन्हा 20% शेअर्सच्या किमतीत वाढ झाल्यास त्या कंपनीच्या शेअर्समधील खरेदी-विक्रीचे व्यवहार त्या दिवसासाठी थांबवले जातात. अशा अवस्थेला अप्पर सर्किट लागणे असे म्हणतात.
लोअर सर्किट म्हणजे काय? : बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने पडतात. अशा परिस्थितीत, त्या स्टॉकमध्ये खूप घसरण होऊ नये, म्हणून लोअर सर्किट लावले जाते. मूल्य कमी होण्याच्या या मर्यादेला लोअर सर्किट म्हणतात. लोअर सर्किटमध्ये 10%, 15% आणि 20% असे तीन टप्पे असतात. या प्रत्येक टप्प्यावर शेअर्स घसरल्यास शेअर्सचा खरेदी-विक्री व्यवहार काही वेळेसाठी थांबवला जातो. शेअर्स दिवसभरात तिसऱ्या टप्प्यात 20 टक्के घसरल्यास संपुर्ण दिवसभरासाठी व्यवहार थांबवला जातो. यालाच लोअर सर्किट लागणे असे म्हणतात.
स्टॉक मार्केट सदंर्भातील इतर आणि आवश्यक माहितीसाठी याच आपल्या ब्लाॅगवर विविध लेख उपलब्ध आहेत. या लेखांचे वाचन करून आपण यशस्वी ट्रेडर्स आणि उत्तम इन्व्हेस्टर नक्कीच बनू शकतात. शिवाय आपल्या मदतीला एचके लर्निंग ॲन्ड एनएए आहेच. आपण hklearning-naa.blogspot.com या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन केल्यास आपल्याला प्रत्यक्ष सरावातून स्टॉक मार्केट शिकवले जाते.
(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनएए (लेखक शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आणि निसर्ग अभ्यासक आहेत.)
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा