मार्केट : टेक्निकल - फंडामेंटल

एचके लर्निंग अँड एनएए :
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी येथे काम कसे केले जाते हे समजून घेतले पाहिजे. कोणत्याही कंपनीचा स्टॉक खरेदी करण्यासाठी त्या कंपनीविषयी माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजेच लाँग टर्म गुंतवणुकदारांसाठी त्या कंपनीचे फंडामेंटल समजून घेणे महत्त्वाचे होय. त्याचबरोबर स्टॉकसंबंधी टेक्निकल अभ्यासही करता आला पाहिजे. म्हणजे फसगत होत नाही. या लेखाद्वारे फंडामेंटल आणि टेक्निकल काय असते याची सखोल आणि सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. याद्वारे आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये योग्य पध्दतीने काम करत आपले उत्पन्न वाढवता येईल. चला तर मग टेक्निकल आणि फंडामेंटल एनालिसीस म्हणजे काय? याबद्दलची समज विकसित करून आपणास नक्कीच यशस्वी गुंतवणूकदार बनता येईल. शेअर कधी खरेदी आणि विक्री करावा यासाठीही आपणास या माहितीतून मदत होईल.

टेक्निकल एनालिसीस म्हणजे काय? : टेक्निकल एनालिसीसवरून कोणत्याही स्टॉकच्या चार्टद्वारे त्याच्या दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक हालचाली आणि किमतीची माहिती मिळते. बहुतांश शेअर्सचा सपोर्ट (आधार) आणि रेझिस्टन्स (प्रतिकार) चार्ट अभ्यासल्यावर कळतो. सपोर्टचा अर्थ म्हणजे स्टॉक विशिष्ट किंमतीपासून किती वेळा वाढला आहे असा होतो. विश्लेषक केवळ सपोर्ट लेव्हलवर खरेदी करण्याची शिफारस करतात. दुसरीकडे, रेझिस्टन्स म्हणजे एका किमतीवरून स्टॉक किती वेळा पुन्हा खाली आला आहे. जर एखादा शेअर त्याचा रेझिस्टन्स (प्रतिकार) ब्रेक करून वरच्या दिशेने गेला तर अशा अवस्थेला  ब्रेकआउट म्हणतात, याचा अर्थ असा होतो की शेअरची किंमत पुढे आणखी वाढणार आहे. याउलट, जर स्टॉक रेझिस्टन्स (प्रतिकार) लेव्हल क्रॉस न करता पुन्हा माघारी फिरला तर अशा अवस्थेत स्टॉकमध्ये सेलिंग प्रेशर येते आणि तो स्टॉक पुन्हा सपोर्ट लेव्हल (आधार पाळळी) जवळ येऊन पोहोचतो. याला काही कालावधी लागतो. अशा अवस्थेत पेशंस ठेवून सपोर्ट लेव्हलजवळ खरेदीची प्रतिक्षा असायला हवी. म्हणजे पुढच्या अपट्रेन्ड रॅलीमध्ये प्रॉफिट मिळण्याची शक्यता असते. मात्र ते प्रॉफिट रेझिस्टन्स लेव्हलजवळ (प्रतिकार पातळी) बुक करणेही महत्त्वाचे आहे. मार्केटमध्ये काम करताना कुठे खरेदी करावी आणि कुठे प्रॉफिट बुकिंग करावे हे समजणे खुपच महत्त्वाचे आहे.  टेक्निकल एनालिसीसद्वारे हेच मार्गदर्शन मिळते. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये काम करत असताना टेक्निकल एनालिसीसमध्ये पारंगत असायलाच हवे. 

टेक्निकल एनालिसीसमध्ये महत्त्वाचे सूचक : टेक्निकल एनालिसीसमध्ये निर्देशक हे महत्त्वाचे साधन आहेत. वास्तविक, ते स्टॉकच्या हालचालीबद्दल महत्त्वाचे संकेत देतात. यामध्ये मूव्हिंग एव्हरेज, RSI, MACD, सुपर ट्रेंड आणि बोलिंगर बँडसह अनेक निर्देशकांचा समावेश आहे. प्रत्येक निर्देशकाचे स्वतःचे महत्त्व असते परंतु शेअर बाजारात सक्रिय असलेले बहुतेक विश्‍लेषक मूव्हिंग एव्हरेज, MACD आणि RSI निर्देशक महत्त्वाचे मानतात. याविषयी आपल्या ब्लॉगवर सविस्तर माहिती ‘टेक्निकल इंडिकेटर्स आणि मार्केट’ या लेखात देण्यात आलेली आहे. आपण https://hklearning-naa.blogspot.com/2022/03/blog-post_98.html या लिंकवर जाऊन हा लेख अभ्यासावा.

विशेषकरून स्टॉक मार्केटमध्ये काम करताना MACD आणि RSI या इंडिकेटरचा जास्तीत जास्त वापर केला जातो. MACD मध्ये कोणत्याही स्टॉकच्या शेवटच्या 5, 10, 20, 50, 100 आणि 200 दिवसांच्या सरासरी किमतीचा मुव्हिंग एव्हरेज इंडिकेटरद्वारे अभ्यास केला जातो. वेगवेगळ्या कालमर्यादेवरील शेअरच्या किमतीतील वाढ आणि घसरणीवरून वाढ आणि मंदीचा अंदाज लावला जातो. त्याचप्रमाणे RSI (Relative Strength Index) सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक आलेखाद्वारे स्टॉकमध्ये किती खरेदी आणि विक्रीचे वर्चस्व आहे हे समजून घेता येते. 

फंडामेंटल एनालिसीस म्हणजे काय? : फंडामेंटल एनालिसीसमध्ये (मूलभूत विश्लेषण) कोणत्याही कंपनीचे व्यवसाय मॉडेल आणि वाढीचा मागील काळातील इतिहास अभ्यासला जातो. यामध्ये प्रामुख्याने कंपनीची आर्थिक स्थिती पाहिली जाते. P/E गुणोत्तर आणि P/B गुणोत्तर यासारखे गुणोत्तर पाहिले जातात. जर किंमत कमाई गुणोत्तराचे मूल्य कमी असेल, तर याचा अर्थ वाढीसाठी भरपूर वाव आहे. दुसरीकडे, जर किंमत ते बुक व्हॅल्यू गुणोत्तर कमी असेल तर याचा अर्थ स्टॉकचे अवमूल्यन झाले आहे. यावरून स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी किंवा नाही यासंदर्भात गुंतवणुकदारांना योग्य निर्णय घेता येतो. लाँग टर्म (दिर्घ काळ) गुंतवणुकदारांनी फंडामेंटल एनालिसीस केल्यानंतरच कुठल्याही स्टॉकमध्ये गुंतवणुक करणे योग्य असते. 

फंडामेंटल एनालिसीसमध्ये, कंपनीची मालमत्ता आणि दायित्वे यांचा अभ्यास करून कंपनीचे निव्वळ मूल्य काढले जाते. या आधारे कंपनीच्या शेअरच्या किमतीचा अंदाज लावता येतो. या अभ्यासातून कंपनीचे लाभांश धोरणही दिसून येते. अशा अभ्यासाचा उपयोग भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांना ओळखण्यासाठी केला जातो. या सरावातून यशस्वी गुंतवणुकदार नक्कीच बनता येते.

टेक्निकल आणि फंडामेंटल विश्लेषणची माहिती घेतल्यानंतर आता आपणास प्रश्न पडला असेल, की हे ज्ञान कुठून घ्यायचे किंवा शिकायचे. तर उत्तर अगदी सोपे आहे. आपल्या याच एचके ब्लॉगवर स्टॉक मार्केट संदर्भात विविध लेख उपलब्ध आहेत. ज्यातून आपण संपुर्ण स्टॉक मार्केटचा अभ्यास सोप्या भाषेत समजून घेऊ शकतात. याशिवाय शेअर बाजारात नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट (NISM) च्या माध्यमातून कोर्सेसही उपलब्ध आहे. या कोर्सद्वारे टेक्निकल आणि फंडामेंटल विश्लेषक बनता येते. कोर्स पुर्ण केल्यावर आपण स्वतंत्र विश्‍लेेषक किंवा संबंधीत संस्थांमध्ये जॉबही करू शकतात. 

(कैलास एन. हिरोडकर) संपादक, संचालक : एचके ब्लॉग आणि एचके लर्निंग अँड एनए (लेखक शेअर बाजाराचे स्वतंत्र विश्लेषक आणि निसर्ग अभ्यासक आहेत.)


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली