रॉकेट्री : द नंबी इफेक्ट
चित्रपटाची सुरवात होते ती नंबी यांच्या मुलाखतीपासून. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा नंबी यांची १० मिनिटांची मुलाखत घेण्यासाठी आलेला असतो. नंबी आपल्या जीवनाची कथा सांगण्यास सुरवात करतात ती त्यांच्या घरापासून. संपूर्ण कुटुंब हे साधेपणाने आयुष्य जगत असतात. एक दिवस पोलीस नंबी यांना अटक करतात. पत्नी व मुले यांना मारहाण करून घरावर दगडफेक केली जाते. या जगप्रसिद्ध वैज्ञानिकाला अटक करण्याची गरज काय? त्यांनी असं काय केल आहे, की ज्यामुळे त्यांना पोलीस कोठडीत डांबून ठेवले? तर याचे उत्तर म्हणजे देशद्रोह..! आपल्या शेजारील शत्रू राष्ट्राला आपल्या देशातील गोपनीय माहिती विकल्याचा आरोप त्यांच्यावर होतो.
हीच कथा भूतकाळात घेऊन जाते ती थेट इस्रोमध्ये. १९६९ साली प्रिस्टन विश्वविद्यालय, अमेरिका येथून M.S. साठी नंबी यांना बोलावणे येते. आवडता विषय रॉकेटवर नंबी शिक्षण पूर्ण करतात. नंबी अमेरिकेत नील आर्मस्ट्रॉंग व युरी गागरीन सोबत शिक्षण घेतात. जो प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी एका विदयार्थीला 3 वर्ष लागतात तेथे नंबी १० महिन्यांत पूर्ण करतात. त्यांच्या या प्रगल्भ बुद्धिमत्तेमुळेच त्यांना नासामध्ये फेलोशिप मिळते. परंतु आपण ज्या देशातून आलो आहोत, त्या देशासाठी काहीतरी करण्याची ही संधी समजून प्रथम देश निवडतात. लाखो रूपयांची नोकरी सोडतात आणि उपग्रह तंत्रज्ञान व रॉकेट या क्षेत्रात भारताचे नाव अव्वल करण्यासाठी आपल्या मायभूमीवर ते परततात. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक आणि राजकीय सहकार्य उपलब्ध नसते. तरीसुद्धा नंबी काय धडपड करतात हा प्रवास बघण्यासारखा आहे. नंबी देशासाठी उत्तम पद्धतीचे स्वदेशी "विकास" इंजिन तयार करतात. हेच 'विकास' रॉकेट इंजिन मंगळयान मोहिमेसाठी वापरण्यात आले आहे. अशा प्रकारे मुलाखतीमध्ये आपल्या आयुष्याचे एक एक पान नंबी उघडतात. नंबी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप होतो त्यावेळी त्यांची पत्नी मीना यांना जबरदस्त मानसिक धक्का बसतो. संपूर्ण कुटुंब अस्तव्यस्त होते. कोर्टकेस, लोकांचा त्रास यामुळे नंबीही खचलेले असतात; परंतु त्यांना सहकार्य असते ते 'इसरो' टीमचे.
एका दृश्यात नंबी व त्यांची पत्नी हे हॉस्पिटलच्या बाहेर रिक्षा थांबवतात; परंतु रिक्षावाला त्यांना देशद्रोही समजून रिक्षातून ढकलून देतो आणि ते जिथे पडतात तिथे भारताचा राष्ट्रध्वज लावलेला असतो, हे दृश्य मनाला सुन्न करून जाते. ज्यावेळी मुलाखत संपते त्यावेळी नंबी हे एका साध्या स्कुटरवरून घरी जातात. त्याच वेळी त्यांचा मित्र जो अमेरिकेत त्यांची मुलाखत बघत असतो त्यांना सुरक्षारक्षक त्यांच्या गाडीपर्यंत सोडतो. हे दृश्य मनात अनंत प्रश्न उत्पन्न करतात. त्याग, प्रामाणिकता शून्य वाटायला लागते. नंबी यांनी याचसाठी स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेऊन देश हिताचा निर्णय घेतला होता का? आणि एवढे करून त्यांच्या पदरी देशद्रोह आला असेल तर त्यांच्या केलेल्या त्यागाला काय अर्थ? देशद्रोही कोण? नंबी कि त्यांच्यावर आरोप लावणारे? हे संतापजनक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आक्रमकतेने उभे राहतात. जबाबदार यंत्रणेवर राग आल्याशिवाय राहत नाही. आणि अखेर हेच शब्द बाहेर पडतात कि याचमुळे आपल्या भारतातील "ब्राईट माईंडस" बाहेरील देशाचा मार्ग निवडतात.
मुलाखतीत नंबी शेवटी म्हणतात की, ''माझी निर्दोष मुक्तता केली याबद्दल मी आभारी आहे; परंतु मला सॉरी म्हणू नका, आतापर्यंत मला जो मानसिक, शारिरिक त्रास झाला आहे त्याची भरपाई मला हवीच आहे..! तरच मी हा न्याय झाला असे समजेल.'' यातून स्पष्ट होते की, चुकीचे आरोप त्यांनी कदापि मान्य केले नाही आणि त्यापुढे झुकलेही नाही . दिग्दर्शक, लेखक आर. माधवन यांनी या चित्रपटाद्वारे सत्यता मांडून जबाबदार यंत्रणेसमोर आत्मपरीक्षणासाठी प्रश्न उभे केले आहेत. आपल्या जीवनाचे "रोल मॉडेल" कसे असावे, हे या चित्रपटातून रेखांकित होते. या चित्रपटाला 5 स्टार रेटिग देण्यात आले आहे.
प्रिय वाचकांनो, चित्रपटाचे विश्लेषण आपणास कसे वाटले हे आपल्या प्रतिक्रयाद्वारे नक्की कळवा. कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रया आपणास नोंदवता येईल. पून्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह..! आपल्या 'एचके ब्लॉग' वर विविध विषयांवरील साहित्याचा खजिना उपलब्ध आहे. स्वतः आनंद घ्या आणि आपल्या मित्र-परिवारालाही ब्लॉग शेअर करून लाभ होऊ द्या. वाचनाने व्यक्ती समृद्ध आणि विचारांनी संपन्न होतो..! धन्यवाद..!
लेखक चित्रपट समीक्षक आहेत.
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI
अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत वर्णन केलेय संपूर्ण चित्रपटाची ओळख झाली
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻😊
हटवाखूप छान, movie theatre la nakki बघणार.
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻😊
हटवाMast ch👍
उत्तर द्याहटवाThank you 🙏🏻😊
हटवाचित्रपट बघण्यासाठी प्रेरित करणार छान लेख लिहीला आहे
उत्तर द्याहटवाThank you 😊🙏🏻
हटवाश्री. नंबी यांना मिळालेली वागणूक निदनियच म्हणावी लागेल. त्याग आणि प्रामाणिकतेचा असा परतावा मनाला सुन्न करून जातो. चित्रपट विश्लेषण उत्तम केले आहे. करिअरसाठी विदेश का िनवडले जाते याचे हे उत्तम उत्तर आहे...
उत्तर द्याहटवाThank you 😊🙏🏻
हटवा