सस्पेन्स, थ्रिलर : दृश्यम-2

एचके लर्निंग अँड एनएए :
शब्दांवर विश्‍वास ठेवू नका. कारण शब्द मनात भ्रम निर्माण करतात, पण दृश्‍य कधीच खोटं बोलत नाही..! पटकथा, संवाद आणि मांडणीच्या आधारे या चित्रपटात हे पटवूनही देण्यात आले आहे. आजवर प्रदर्शीत झालेल्या चित्रपटांमध्ये सत्याचा विजय आणि असत्याचा पराजय होतो, असे दाखवण्यात आले आहे मात्र या चित्रपटात अगदी उलट घडूनही प्रेक्षकांना चित्रपट खिळवून ठेवतो. हीच खरी दृश्‍यमची जादू म्हणायला हवी. अजय देवगणची मुख्य भुमिका असलेला हा सस्पेन्स, थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. पहिल्या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षक अवाक्‌ झाले होते. आता पुन्हा एकदा सस्पेन्स आणि थ्रिलर असा डबल डोस घेऊन ‘दृश्‍यम-2’ हा स्वीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चला तर मग, दृश्यम-2 वर प्रकाश टाकण्याआधी दृश्यम-1 चा मागोवा घेऊया..!

‘2 अक्तुबर को क्या हुआ था?’ हा प्रश्‍न सिनेप्रेमींना चांगलाच परिचयाचा असेल. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दृश्‍यम’ या चित्रपटातील तुफान गाजलेला हा डायलॉग..! यावर आजही मीम्स व्हायरल होतात. 31 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘दृश्‍यम’ या चित्रपटाने सस्पेन्स, थ्रिलर, मिस्ट्री यासाठी बाजी मारली होती. विजय सालगावकर पॉडोलिन, गोवा येथे आपल्या परिवारासोबत राहत असतो. विजयच्या मुलीच्या हातून समीर देशमुख नावाच्या मुलाचा खून होतो. आणि चौथी नापास असलेला विजय आपल्या परिवाराचे रक्षण करण्यासाठी कंबर कसतो. जिथे जिथे पोलिसांना या खून प्रकरणाचे धागेदोरे मिळतील अशा सर्व जागा विजय अत्यंत बारकाईने व सफाईने पुसतो; परंतु पोलिस अधिकारी गायतोंडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु विजयने ‘दृश्य’ अशा प्रकारे मांडलेले असते की पोलिस व कायदा हात बांधून निमूटपणे सर्व घटना बघत असतात. या घटनेमुळे अनेक लोकांच्या आयुष्यात वादळे येतात; परंतु या सर्वामध्ये स्तब्ध उभा असतो तो विजय..! अखेर कुठलाही पुरावा मिळत नसल्यामुळे हे प्रकरण बंद करण्यात येते.

आता वळूया दृश्‍यम-२ कडे...! वरील घटनेला 7 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या 7 वर्षात जिथे विजय राहतो तिथे अनेक बदलही झालेले आहेत. विजयने स्वतःचा एक सिनेमा हॉल सुरू केलेला आहे, कारण विजयला चित्रपटांचे वेड आहे आणि लवकरच तो स्वतः एक चित्रपटही बनवणार आहे. प्रत्येक चित्रपट बघून हा चित्रपट चालणार की नाही याचे विश्लेषण तो करतो. सर्व काही सुरळीत सुरु असताना डेव्हीड नावाचा एक व्यक्ती जो खून प्रकरणात तुरुंगात असतो त्याची सूटका होते आणि तो 7 वर्षानी घरी परततो. आपल्या परिवाराची वाईट अवस्था डेव्हीडला अस्वस्थ करते. कर्जात बुडालेला डेव्हीड पैसे कमवण्यासाठी काम शोधू लागतो.  यातच त्याची भेट विजय सोबत होते. 7 वर्षापूर्वी घडलेल्या सर्व घटना त्याला आठवतात. त्या रात्री पोलिस स्टेशन बाहेर तो लपलेला असतो तिथेच विजयच्या मुलीवर खूनाचा आरोप आहे हे त्याला समजते. त्याच्या लक्षात येते की, पोलीस ज्या बॉडीचा शोध 7 वर्षापासून घेत आहेत ती बॉडी विजयने पोलिस स्टेशनमध्येच लपवलेली आहे. 

ज्या मुलाचा खून झाला आहे तो गोवा शहाराची आय. जी. मीरा देशमुख व महेश देशमुख यांचा मुलगा आहे. आपल्या मुलाला विजयनेच मारले आहे याची मीरा यांना पूर्णपणे खात्री आहे. आता तरुण अहलावत (अक्षय खन्ना) गोवा शहराचे नवीन आय. जी. बनून येतात. विजयची केस हातात घेतात. जो व्यक्ती या केसमध्ये नवीन पुरावे सादर करणार त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर होते. यामुळे विजय व त्याचा परिवार पुन्हा एकदा अडचणीत येतो. यात डेव्हीड पैशांसाठी  काहीही करण्यास तयार झालेला असतो. तो सर्व सत्य पोलिसांसमोर उलगडतो आणि पोलिस स्टेशनमध्ये एक व्यक्तीचा हाडांचा सापळाही सापडतो. 

आता विजय काय करणार? आपण केलेल्या कृत्याची कबुली देणार का? किंवा 2, 3 व 4 ऑक्टोबरला  आपण इथे नव्हतोच यावर ठाम राहणार ? या सर्व प्रश्नांचा उलगडा ‘दृश्यम -2’ मध्ये होतो. चित्रपटाचा शेवट सुन्न व निशब्द करणारा आहे. बौद्धिक खेळ अन्‌ चाणाक्षपणा या चित्रपटाचा गाभा असल्याचे स्पष्ट जाणवते. दृश्यम (2013-Original) हा चित्रपट मल्यालम अभिनेता मोहनलाल यांनी यात मुख्य पात्राची भूमिका केली आहे. व हिंदी भाषेत अनुवाद करून दृश्यम भाग 1, 2 ची निर्मिती केली गेली आहे. आतापर्यंत तमीळ, तेलगू, कन्नड, हिंदी, श्रीलंकन, चीन,  जपान असे जवळपास ७ ते ८ भाषांमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात अजय देवगण, तब्बू, प्रिया सरण, इशिता दत्ता, रजत जाधव, कमलेश सावंत, योगेश सोमण यांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी यशस्वीपणे ‘दृश्यम-2’ ला पडद्यावर उतरविला आहे. 

प्रिय वाचकांनो, चित्रपटाचे विश्लेषण आपणास कसे वाटले हे आपल्या प्रतिक्रयाद्वारे नक्की कळवा. कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रया आपणास नोंदवता येईल. पून्हा भेटूया एका नवीन चित्रपटासह..!  आपल्या 'एचके ब्लॉग' वर विविध विषयांवरील साहित्याचा खजिना उपलब्ध आहे. स्वतः  आनंद घ्या आणि आपल्या मित्र-परिवारालाही ब्लॉग शेअर करून लाभ होऊ द्या. वाचनाने व्यक्ती समृद्ध आणि विचारांनी संपन्न होतो..! धन्यवाद..!

मेघनिल उगले
लेखक चित्रपट समीक्षक आहेत. 
Email : Ugalemeghnil@gmail.com
मोबाईल : 9168538581


आपले उत्पन्न वाढवा!
तुमचे डिमॅट, आमचे श्रम या अनोख्या व्यावसायिक पद्धतीतून एचके लर्निंग आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सज्ज आहे.  आपले आर्थिक व शारीरिक आरोग्य सुदृढ राहावे हाच एकमेव उद्देश. आम्ही आपल्यासाठी काम कसे करतो हे जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या. 8149347309/ 7249667309 वर संपर्क साधा.
Blog : https://hklearning-naa.blogspot.com
Video : https://youtu.be/FyWl4a3CzwI

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

इक्विटी, इटीएफ अन्‌ म्युच्युअल फंड

शेअर बाजारातून आर्थिक संपन्नता

बचत-गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी

कुटुंबातील आदर्श पालकत्व अन्‌ मुलं

स्वनियंत्रक अन्‌ आदर्श बना...!

महावैद्यराज एरंडेल वनस्पती

भविष्य आर्थिक विकासाचे

यशस्वी ट्रेडर्स अन्‌ गुंतवणूकदार बना

मधुमेही अन्‌ उपवास

आर्थिक विकासाची गुरूकिल्ली